दिवस 247; डेंगी 'पॉझिटिव्ह' 430 

Marathi News Solapur News Dengue patient
Marathi News Solapur News Dengue patient

सोलापूर - शहरात गेल्या वर्षभरात 1049 जणांना डेंगी सदृश आजाराची लागण झाली आहे. त्यापैकी 430 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी यासंदर्भात प्रशासनासमोर प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्यासाठी प्रशासनाने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी टिपणी तयार केली आहे. 

गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) डेंगीचे सर्वाधिक 352 संशयित आढळले होते. त्यापैकी तब्बल 151 जणांना लागण झाली होती. 13 डिसेंबरपर्यंत 87 संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी 21 जणांना डेंगीची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. साथीच्या आजाराबाबत महापालिका प्रशासन नेहमीच उदासीन असल्याचे यापूर्वी वारंवार दिसले आहे. साथ पसरली की तात्पुरत्या उपाययोजना करायच्या, असे त्यांचे धोरण राहिले आहे. प्रशासनानेच दिलेल्या माहितीचा आधार घेतला, तर 1 जानेवारीपासून 13 डिसेंबर या 247 दिवसांत 430 पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यानुसार रोज सरासरी दोन जणांना डेंगीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 
आकडे बोलतात - 
एकूण संशयित रुग्ण - 1049 
अहवाल प्राप्त - 983 
अहवाल प्रलंबित - 066 
पॉझिटिव्ह अहवाल - 430 
निगेटिव्ह अहवाल - 553

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com