महापालिका अग्निशमन दलाने 601 प्राणी-पक्ष्यांना दिले जीवदान 

Emergency-fire
Emergency-fire

सोलापूर - महापालिका अग्निशमन दलाने गेल्या 13 वर्षांत संकटात सापडलेल्या तब्बल 601 प्राणी-पक्ष्यांना जीवदान दिले आहे. तसेच पंतगाच्या मांज्यामुळे अडकलेल्या शेकडो पक्षांची सुटका केली आहे. 

आग विझविणे हे अग्निशमन दलाचे मुख्य काम असले, तरी मालमत्ता वाचविणे आणि जीवितहानी होणार नाही यासाठी दलाचे जवान कार्यरत असतात. केवळ माणसांचेच नव्हे, तर शेकडो प्राणी-पक्ष्यांचे जीव वाचवून दलाने कर्तव्य पार पाडले आहे. आपत्कालीन स्थितीत घरांत अडकलेल्या लोकांची सुटका करणे, विजेच्या खांबावरील वायरीच्या जंजाळात तसेच झाडावर अडकलेल्या पक्ष्यांची सुटकाही करण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करतात. 

वाढत्या शहरीकरणाने भांबावून दुर्घटनाग्रस्त झालेल्या शेकडो प्राणी-पक्ष्यांना गेल्या 13 वर्षांच्या कालावधीत दलाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले आहे. त्यांना सुखरूपपणे निसर्गाच्या वाटेवर नेऊन सोडले आहे. वास्तविक पाहता, प्राणी आणि पक्ष्यांची सुटका करणे ही जबाबदारी अग्निशमन दलाची नाही; परंतु सामाजिक भान ठेवीत नागरिक आणि पर्यावरण मित्रांच्या विनंतीवरून दल हेही काम करीत असते. कावळा, घार, मांजर, विविध प्रकारचे पक्षी, गाय यांचा समावेश आहे. उंचावर अडकलेले, पतंगाच्या मांजात पाय गुंतलेले, जखमी, विजेच्या तारेमध्ये अडकलेल, झाडाच्या फांदीत किवां घराच्या तावदानात अडकलेल्या अनेक पक्षांना यामुळे जीवदान मिळाले आहे. 

अग्निशमन दलाची कामगिरी 

वर्ष पक्षी संख्या
2006        46 
2007 52 
2008 54
2009 42
2010 48
2011 63
2012 37
2013 48
2014 46
2015 24
2016 42
2017 79
2018 20
एकूण 601

पशू-पक्षी अडकल्याची घटना घडल्यानंतर नागरिक सर्वप्रथम अग्निशामक दलाला कळवितात. पूर्वी हे कॉल कमी होते. "सकाळ'मध्ये पशू-पक्षी वाचवल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यापासून कॉल वाढले आहेत. अशा वेळी पर्यावरण आणि पशू-पक्षिमित्रांवर विसंबून वेळ घालविण्यात अर्थ नसतो. या कॉलचीही आम्ही तातडीने दखल घेतो.
- केदारनाथ आवटे, अधीक्षक, सोलापूर महापालिका अग्निशमन दल
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com