सिद्धेश्‍वर कारखाना परिसरातील हौदात बुडून मुलीचा मृत्यू

dead body
dead body

सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखाना परिसरातील हौदातील पाण्यात
बुडून ऊसतोड कामगाराची ३ वर्षांची मुलगी स्वप्नाली शहादेव धुमाळ हिचा
मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सकाळी १० च्या सुमारास घडली.

रविवारी सकाळी सिध्देश्वर साखर कारखाना परिसरातील ऊसतोड कामगारांच्या वस्तीवरील लहान मुले खेळत होती.मुलांसोबत खेळताखेळता  स्वप्नाली ही हौदाच्या परिसरात गेली. तोल जाऊन ती हौदात पडली. इतर मुलांनी पळत जाऊन घरच्यांना याबाबतची माहिती दिली. हौदातील पाणी १० ते १५ फूट खोल असल्याने स्वप्नाली बुडून खाली गेली होती. शोधूनही ती सापडली नाही. घटनेची माहिती अग्निशमन दलास
कळविण्यात आली. अग्निशमन दलाच्या जीवरक्षकांनी पाण्यात उतरून तिचा शोध घेतला. तीन तासांनी तिचा मृतदेह पाण्यात सापडला. या घटनेनंतर तिच्या आईने आक्रोश केला. मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

स्वप्नाली ही आई मंगला धुमाळ यांच्यासोबत कारखान्यावरील वस्तीवर राहण्यास होती. तिचे मुळ गाव पिंपळगाव (जिल्हा- बीड) हे आहे. वडील शहादेव हे उसतोडणीसाठी परगावी असल्याचे सांगण्यात आले. शहादेव यांना ३ मुली असून स्वप्नाली ही आईसोबत सोलापूरला आली होती.

दुर्घटनेस जबाबदार कोण?
सिध्देश्वर साखर कारखाना प्रशासनाने हौद परिसरात उंच कठडा बांधला असता तर स्वप्नाली पाण्यात पडली नसती. या घटनेस जबाबदार कोण ? याबाबत दिवसभर कारखाना परिसरात चर्चा होती. दरम्यान या घटनेबाबत विजापूर नाका पोलिसात अकस्मात मयत नोंद झाली आहे. अद्याप कोणीही तक्रार दिली नसल्याचे पोलिस नाईक आर. एम. पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com