करमाळा : उसाच्या ट्रकखाली चिरडून पती-पत्नी जागीच ठार

Marathi news solapur news Karnala accident two died on the spot
Marathi news solapur news Karnala accident two died on the spot

करमाळा : करमाळा-टेंभुर्णी रस्तावर देवळाली जवळ ऊस वाहतुक करणारा ट्रक पलटी होऊन अंगावर पडल्याने शेळ्या राखणाऱया पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज करमाळा-टेंभुर्णी रस्त्यावर देवळाली येथील चांदणेवस्ती येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे.

देवळाली येथील साहेबराव श्रावण चांदणे (वय 65) व मिराबाई साहेबराव चांदणे (वय 52) हे दोघे शेळ्यासाठी शेतात शेवरीचे फाटे काढत असताना करमाळ्याकडे निघालेला ऊसाचा ट्रक (क्रमाक एम.एच.16 क्यु 5131) पलटी झाला. ट्रकमधील उसाच्या ढिगाऱयाखाली शेळ्या राखणारे चांदणे पती -पत्नी सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ऊसाच्या ढिगाऱयाखाली एक मोटरसायकल ही सापडली आहे. मोटरसायकलस्वार यात जखमी झाला आहे.

या घटनेनंतर संतप्त गावक-यांनी रस्ता रोको आनंदोन केले. यावेळी प्रमाणापेक्षा अधिक ऊस वाहतुक करणा-या ट्रक व ट्रक्टरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com