साखरेवरील आयात कर वाढविण्याची मागणी

साखरेवरील आयात कर वाढविण्याची मागणी
साखरेवरील आयात कर वाढविण्याची मागणी

माळीनगर (सोलापूर) - जागतिक बाजारात गेल्या तीन महिन्यात कच्च्या साखरेच्या दरात 30 टक्‍क्‍यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे देशातील साखरेच्या दरावर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी भारतात येणाऱ्या कच्च्या साखरेवरील आयात कर 40 टक्‍क्‍यांवरून 60 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याची मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) केंद्राकडे केली आहे. तसेच इथेनॉलवरील सेवाकर 18 टक्‍क्‍यांवरून पाच टक्के करण्याची मागणी देखील इस्माने केली आहे.

यंदा एकूणच जागतिक साखर उत्पादन अधिक होण्याची शक्‍यता व भारतासह अन्य प्रमुख साखर उत्पादन करणाऱ्या देशात अतिरिक्त साखर उत्पादन होण्याचा अंदाज या कारणांमुळे कच्च्या साखरेच्या भावात मोठी घट झाली आहे. अशातच ब्राझीलमध्ये एप्रिल महिन्यापासून साखर उत्पादन सुरु झाल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या किंमतीत आणखी हळूहळू घट व्हायला सुरुवात झाली आहे.
इस्माच्या मते, कच्च्या साखरेच्या दरात यापुढे आणखी घट झाली आणि त्यावरील आयात कर 40 टक्केच ठेवला तर कच्ची साखर अगदी सहजपणे व नफा मिळवून भारतात आयात होऊ शकते. असे घडले तर देशांतर्गत बाजारात साखरेच्या किंमतीत मोठी घसरण होईल. हि बाब देशातील साखर कारखान्यांसाठी अव्यवहार्य ठरेल. केंद्र सरकारने येत्या गाळप हंगामासाठी उसाच्या एफआरपीत 11 टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. देशांतर्गत साखरेच्या दरात घसरण झाली तर प्रतिटन 2550 रुपये एफआरपी देणे कारखान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसेल, असे इस्माने म्हटले आहे.

कच्ची साखर आयात करण्याची गरज नाही
देशांतर्गत बाजारात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पाच लाख टन कच्ची साखर विनाशुल्क आयात करण्याची परवानगी अगोदरच दिली आहे. इस्माच्या मते, यापुढे कच्ची साखर देशात आयात करण्याची कसलीच गरज नाही. त्यामुळे साखरेच्या दरात पडझड होऊ नये, यासाठी कच्च्या साखरेवरील आयात कर 60 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवायला हवा. दरम्यान, वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना भेटून इथेनॉलवरील जीएसटी कमी करण्याची विनंती केली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -

काँग्रेस आमदार सत्तार यांच्याकडून शेतकऱ्याला मारहाण
मुंबई: मेट्रोसाठी 'आरे'मधील जागा हस्तांतरीत करण्याचा मार्ग मोकळा
करमाळा- 'आदिनाथ'च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे संतोष जाधव-पाटील
कर्जमाफी : चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार
पुणे: चार धरणांत साडेअकरा टक्के पाणीसाठा शिल्लक

बारामतीत पावसाच्या जोरदार सरी
VIDEO: लंडनमध्ये 27 मजली इमारतीला भीषण आग
डास, चिलटांमुळे भूकंप होत नाही - भाजपकडून प्रतिहल्ला
#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'​
दोन मिनिटांनी मोठी निष्ठा टक्‍क्‍यांनीही पुढेच​
अमित शहांच्या दौऱ्यात शक्तीप्रदर्शनासाठी हजार रूपये
सरकार धमक्‍यांना घाबरत नाही - चंद्रकांत पाटील​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com