मंगळवेढा : वैद्यकीय अधिकाऱ्यांआभावी रुग्णांची गैरसोय

मंगळवेढा : वैद्यकीय अधिकाऱ्यांआभावी रुग्णांची गैरसोय

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील बोराळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त असून केंद्राचा कारभार प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यावर चालला असून रात्रीच्या उपचारासाठी रुग्णाची गैरसोय होत असून रुग्णाचा बळी गेल्यावर आरोग्य खात्याला जाग येणार का असा सवाल विचारला जात आहे.

नदी काठच्या गावाचा समावेश असलेल्या बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत बोराळे सिध्दापूर अरळी ब्रम्हपुरी तामदर्डी उचेठाण मुढवी ही उपकेंद्रे येतात शिवाय मंगळवेढा शहराजवळील दामाजी नगर हा भाग येतो या अंतर्गत असलेल्या गावाची लोकसंख्या 40 हजारापेक्षा अधिक असून नदीच्या परीसरात पावसाळयात विविध साथीचे आजार पसरत असल्यामुळे वैद्यकीय विभाग कायम सतर्क असणे गरजेचे आहे.

विविध प्रकारची लसीकरण व महिलाच्या शस्त्रक्रिया करण्याची वैद्यकीय अधिकारी या केंद्रात कायम स्वरुपी असणे आवश्यक आहे. सध्या बोराळे ते मंगळवेढा हा रस्ता खराब असून एसटी बसेस माचणूर मार्गे जातात अचानक एखाद्या रुग्णाला बोराळे वरुन मंगळवेढयास नेणे सध्या तरी अडचणीचे ठरतआहेत.

शिवाय खराब रस्त्यावर जाताना रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. गरोदर महिलांची तर रात्रीच्या वेळेस बाळंतपणासाठी मोठया संकटाला सामोरे जावे लागत आहे. सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्राचा पदभार हा आंधळगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर दिला असून आंधळगाव केंद्रातील रुग्णाची संख्या देखील मोठी असल्यामुळे तालुक्याच्या पश्‍चिम भागातील आंधळगाव व पूर्व भागातील बोराळेच्या दवाखान्याचे कामकाज करताना त्रासदायक होत आहे. या केंद्रात कायमस्वरुपी निवासी वैद्यकीय अधिकारी देणे गरजेचे आहे. शासनाने लाखो रुपये खर्चुन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासाची सोय केली पण निवासी अधिकारीच नसल्यामुळे ही मालमत्ता देखील धुळ खात पडत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तालुक्यात अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रातही रिक्त पदे ठेवून आरोग्य विभागाने रुग्णाच्या आयुष्याशी खेळण्यापेक्षा कायम स्वरुपी वैद्यकीय अधिकारी द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.

बोराळेसह तालुक्यात रिक्त पदामुळे रूग्णाची गैरसोय होत असून सर्वच शासकीय रुग्णालयात रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली, असे सभापती प्रदीप खांडेकर यांनी सांगितले. नव्याने येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची प्राधान्याने मंगळवेढ्यात नियुक्ती करून रिक्त पदे भरली जातील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com