मोहोळच्या नगराध्यक्षांनी केला नागरिकांच्या समस्यांचा निपटारा

mohol
mohol

मोहोळ : नगराध्यक्ष आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी आजपर्यंत नागरिकांच्या विविध 350 समस्यांचा निपटारा केला असून राज्यातील नगर परिषद स्तरावर असा उपक्रम राबविणारे बारस कर हे राज्यातील एकमेव नगराध्यक्ष आहेत या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रमेश बारसकर यांनी दिली.

सुमारे चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या मोहोळ शहरात अनेक समस्या आहेत. मात्र प्रत्येक समस्येची तक्रार करण्यासाठी नागरीक नगर परिषदेत येत नाहीत. किरकोळ समस्यांची संख्या मोठी असुन त्यात पाणी व स्वच्छतेचा समावेश आहे. जुन्या मोहोळ शहरात पाण्याची तर नव्या शहरात स्वच्छतेच्या तक्रारी आहेत. जुन्या शहरातील गायकवाड व पवार गल्लीत पाण्याची गेल्या पंधरा वर्षापासूनची समस्या होती. तेथील नागरिकांना पाणीच मिळत नव्हते. त्या ठिकाणच्या नागरीकांनी पाण्यासाठी मोठमोठे खड्डे घेतले आहेत. त्यामुळे खड्यात पडुन अनेक अपघात झाले आहेत. त्या ठिकाणी चार इंची जलवाहिनी टाकली त्यामुळे नागरीकांना मुबलक पाणी मिळु लागले. पाण्याची समस्या निकालात निघाली व खड्डेही बुजविले पाणी स्वच्छता वीज या सारख्या रोजच्या मुलभुत समस्यांचे निराकरण जागेवरच झाल्याने नागरीकांचे समाधान झाले आहे. 

दररोज सकाळी सात ने नऊ या वेळेत या उपक्रमाची सुरवात होते. या माध्यमातुन आतापर्यंत 1500 कुटुंबाशी संवाद झाला असून, त्यामुळे जनसंपर्क वाढला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातुन दररोज चार ते पाच की मी चालणे होते. त्यामुळे मला आरोग्यासाठी ही या उपक्रमाचा मोठा फायदा झाल्याचे बारसकर यांनी सांगितले. हा उपक्रम कायम सुरू ठेवण्याचा माझा विचार आहे. समस्यांचा निपटारा करण्यात नगर परिषदेच्या विविध विभागातील कामगारांचेही मोठ सहकार्य मिळत असल्याचे बारसकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com