थकबाकीपोटी भरली २१ हजार ९२० रुपयांची चिल्लर

thakbaaki
thakbaaki

सोलापूर : मिळकतकराच्या थकबाकीपोटी तब्बल २१ हजार ९२० रुपये पाच आणि दहा रुपयांची नाणी देऊन एका बेकरी चालकाने महापालिका कर्मचाऱ्यांना धक्का दिला. पण कर्मचारीही वस्ताद निघाले. त्यांनी ती सर्व रक्कम वसूल करुन बेकरीवाल्याची पूर्ण थकबाकी संपविली. 

सोलापूर महापालिकेची सध्या विशेष वसुली मोहिम सुरु आहे. चौपाडातील बेकरीचालक शिवाजी माने यांच्याकडे २१ हजार ९२० रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी पथक गेले असता त्यांना टाळण्यासाठी पाच व दहा रुपयांची नाणी असल्याचे त्याने सांगितले. एवढी नाणी कर्मचारी घेणार नाहीत, असे माने यांना वाटले. पण कर्मचारीही वस्ताद निघाले. त्यांनी बेकरीच्या परिसरात बसून सर्व रक्कम मोजली व ताब्यात घेतली. १० रुपये मूल्याच्या प्रत्येकी ५०० रुपयांच्या ३२ पिशव्या आणि ५ रुपये मूल्य असलेल्या ५ हजार ९२० रुपयांची एक पिशवी घेण्यात आली. हा प्रकार पाहून सर्वाना गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटाची सर्वाना आठवण झाली. तेजस्विता कासार, वीरांगना घोयलत, श्यामल खराडे, किरण दळवी, सुभाष गोबरे व पांडुरंग सोनवणे यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com