रंग, रेषेच्या जादुई दुनियेत रमले चिमूकले

solapur
solapur

सोलापूर : सकाळी नऊची वेळ... रविवारची सुटी असतानादेखील शाळा-शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती... सोबत रंगपेटी, पेन्सिल आणि चित्रकलेचे इतर साहित्य... मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा... त्याचबरोबर या आगळ्यावेगळ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसोबतच पालकही तितकेच उत्साही... निमित्त होते 'सकाळ चित्रकला‘ स्पर्धेचे.

रविवारी (ता. १७) सोलापूर शहर आणि जिल्ह्यात १३१ केंद्रांवर या स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. उमलत्या कल्पनांचे इंद्रधनू खुलवणारी, शालेय विद्यार्थ्यांसाठीची देशातील सर्वात मोठ्या 'सकाळ' चित्रकला स्पर्धेला सोलापूर शहर व जिल्ह्यात उत्साहात प्रारंभ झाला. सोलापूर शहरातील ४२ व ग्रामीण भागातील ८९ केंद्रांवर हजारो विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

कलेच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. हजारो बालके एकाच वेळी रंग, रेषा आणि आकाराच्या जादुई दुनियेची सफर करीत चित्रकलेचा आनंद सोहळा साजरा करत असून यात सामान्य विद्यार्थ्यांसह अपंग, मूकबधिर व मतिमंद शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com