वाळू उपसा करणाऱ्या वाहनांसह तीन कोटींचा ऐवज जप्त 

sand-mafia
sand-mafia

मंगळवेढा (सोलापूर) - पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या पथकांनी तालुक्यातील तांडोर (बारभाई) येथील अवैध वाळू उपशावर पहाटे धाड टाकून वाळू उपशा करणाऱ्या वाहनांसह सुमारे तीन कोटींचा ऐवज जप्त केला. तेसच या संदर्भात 29 जणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. वाळू उपशा विरूद्ध पोलिसांच्या जिल्हा पथकाची सिद्धापूर नंतर ही दुसरी मोठी कारवाई आहे.
 
तांडूर येथील भीमा नदीच्या पात्रातून रविंद्र ऊर्फ पपुल्या रामा काळे(तामदर्डी), उमेश घाडगे(कवठेमहांकाळ), रूतूराज ताड(मंगळवेढा) हे आपल्या साथीदारासह चोरून वाळू उपसा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पहाटे पाचच्या सुमारास छापा टाकून 20 ट्रक्टर आणि 19 ट्रॉलीसह, 7 ट्रक, 3 जेसीबी, 10 मोटार साईकल, 1 बोलेरो व वाहनातील 90 ब्रास वाळू व घटनास्थळावरील 25 ब्रास वाळू असा अंदाजे 3 कोटी रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच वाळू उपसा करणारे जयप्पा सहदेव गायकवाड, हमीद नबीसाब इनामदार, गणेश जानेश्वर पुजारी, परशुराम रंगनाथ पुजारी, किरण सुरेश नागणे, बिरूदेव विलास मासाळ, वैभव विलास पाटील, बालाजी दगडू मळगे, अर्जून गोपाळराव जाधव, ओंकार शिवानंद व्हडगे, सागर मारूती बिले, सुरेश उत्तम पवार, विशाल जगन्नाथ पवार, महादेव पंडीत अधटराव, उमेश विठ्ठल भायकट्टी, गणेश चंद्रकांत लोखंडे, दामोदर बाळू शिंदे यांना ताब्यात घेतले.  तर रविंद्र ऊर्फ पपुल्या रामा काळे, उमेश घाडगे, रूतूराज ताड, सुरेश ऊर्फ बिबल्या रामा काळे, सचिन काळे, किशोर रामा काळे, विक्या भिमसिंग भोसले, शंकु सुरेश काळे, संजय शरणप्पा भोसले, सुरज शरणप्पा भोसले, अमित शरणप्पा भोसले हे फरार आहेत.

विरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, सपोनि संदीप धांडे, पोसई गणेश निंबाळकर, अंकुश मोरे, अमृत खेडकर, पांडूरंग केंद्रे, श्रीकांत बुरजे, अक्षय दळवी, बाळराजे घाडगे, गणेश शिंदे, सचिन कांबळे, सुरेश लामजाने, अभिजीत ठाणेकर, अनुप दळवी, अमोल जाधव, विष्णू बडे, बालाजी नागरगोजे, महादेव लोंढे व आरसीपी प्लाटून नंबर 2, 3, 4, 5, 6 यांच्या टिमने काम केले आहे. 

गाफिल असलेल्या वाळू माफियांना जिल्हा पथकाने पहाटे कोलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस असल्याचे लक्षात येताच नदीपात्रातील वाळूने भरलेले ट्रॅक्टर, ट्रक, जे.सी.बी नदीपात्रात सोडून उपसा करणाऱ्यांनी तेथून पळ काढत, ऊसाचा शोतात लपण्याचा प्रयत्व केला. महसूल विभागाचा छुपा आशिर्वाद असल्यामुळे रात्रं- दिवस हा उपसा सुरु होता. अवैध ओव्हरलोड वाळू मुळे नदीकाठचे व ग्रामीण भागातील रस्तेही खराब झाले आहेत. यासाठी तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अवैध वाळू उपसा करणार्‍या व वाळू माफियां विरोधात कारवाई करावी यासाठी उपोषण, आंदोलन केल होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com