जिल्हा कृषी महोत्सव, आध्यात्मिक पर्यटनाला चालना द्या: सहकारमंत्री देशमुख

Subhash Deshmukh
Subhash Deshmukh

सोलापूर : सोलापुरात 11 ते 15 मार्च दरम्यान होणाऱ्या जिल्हा कृषी महोत्सवातून सोलापूरचे मार्केटिंग आणि आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल अशा पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात आज सहकार व पणनमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कृषी महोत्सवाच्या तयारीची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अग्रणी बॅंक व्यवस्थापक सुरेश श्रीराम, प्रकल्प संचालक रवींद्र माने, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत आदी अधिकारी उपस्थित होते. सोलापुरातील होम मैदानावर 11 ते 15 मार्च दरम्यान कृषी महोत्सव होणार आहे. महोत्सवात तीनशे स्टॉल उभारावेत, यामध्ये जिल्ह्यातील सर्व विभागांच्या कल्याणकारी योजना यांची माहिती नागरिकांना मिळेळ या दृष्टीने नियोजन करावे अशा सूचनाही सहकारमंत्री देशमुख यांनी दिल्या. 

महोत्सवाच्या यशस्वी संयोजनासाठी सर्व विभाग त्याचबरोबर शेतकरी कंपनी, कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग करून घ्यावा. सोलापुरातील कृषी महोत्सव राज्यात सर्वाधिक भव्य प्रमाणात होईल यासाठी सर्व संबंधित यंत्रणा आणि विभागांनी सक्रियपणे सहभागी व्हावे. संयोजनाबाबतीत कसल्याही प्रकारची मदत लागल्यास जिल्हा प्रशासनास संपर्क साधावा. कृषी महोत्सवातील स्टॉलवर सोलापुरातील खाद्य, संस्कृती, चादर, टॉवेल, बेडशीट यांचेही स्टॉल उभे करण्याच्या सूचनाही श्री. देशमुख यांनी केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com