जिल्हा परिषदेच्या 118 शाळांचे संरक्षक भिंतीचे काम अर्धवट

जिल्हा परिषदेच्या 118 शाळांचे संरक्षक भिंतीचे काम अर्धवट

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आखात्यारित असलेल्या 118 प्राथमिक शाळामध्ये संरक्षित भिंतीचे काम निधीअभावी अर्धवट राहिले असून गेल्या चार ते पाच वर्षापासून या कामासाठी निधी न दिल्यामुळे  पालकवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेने या अर्धवट कामासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी होत आहे.

तालुक्यामध्ये 183 प्राथमिक शाळा असून सरंक्षित भिंत नसल्यामुळे जनावरे व काही विध्नसंतोषी लोकाकडून शाळेच्या आवारात असलेली झाडे व साहित्याची मोडतोड होत होती. मागणी केलेल्या प्राथमिक शाळा करिता सर्व शिक्षा अभियानातून सरंक्षित भिंत बांधण्यासाठी निधी दिल्याने काम करण्यात आले. जागेचे क्षेत्रफळ मोठे असल्याने त्यापैकी 118 शाळाचे काम अर्धवट निधीमुळे रखडलेले दरवर्षी या कामासाठी निधीची मागणी करुनही जिल्हा परिषदेने या कामासाठी निधी दिला नाही. त्यामुळे सरंक्षित भिंत नसल्यामुळे सुटटीच्या कालावधीत  दरवर्षी शतकोटी वर्ष लागवडी लावलेली रोपे मुक्या जनावरामुळे उध्दवस्त केली जातात.शाळेला रंगरंगोटी व भौतीक सुविधा केलेल्या असल्याने याचे विद्रुपीकरण करण्याचे प्रकारही घडत आहे. परिसर विकासासाठी केलेला खर्च वाया जात आहे. यामध्ये आय एस ओ झालेल्या शाळाचाही या अपुऱ्या कामामध्ये समावेश आहे. शिवाय उघड्या मैदानात खेळाचे साहित्य व अन्य उपक्रम लोकसहभागातून करणे संरक्षित भिंत नसल्यामुळे अडचणीचे ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सरंक्षित भिंत असणे आवश्यक आहे. जेणेकरुन वृक्षलागवड व खेळाचे साहित्य उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. 2011-12 पासून या अर्धवट असलेल्या कामासाठीचा निधी मिळाला नाही. यंदा सर्व शिक्षा अभियानातून दोन कोटी 21 लाखाची तरतुद केली असून यामध्ये सरंक्षक भिंतीच्या कामाचा समावेश नसल्याचे जि.प.मधून सांगण्यात आले. यापुढील काळात या कामासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी होत आहे.

आय.एस.ओ शाळा होऊनही सरंक्षित भिंत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मन रमण्यासाठी शाळेच्या परीसरात ग्रा.प. मधून वृक्षलागवड आणि खेळाचे साहित्य बसविण्यात अडचणीत ठरत आहे सरंक्षित भिंतीच्या कामासाठी निधी मिळावा, असे सरपंच कमल चव्हाण यांनी सांगितले.

तालुक्यातील सरंक्षक भिंतीचे काम अर्धवट असलेल्या शाळाची माहिती घेवून लवकरच या रखडलेल्या कामासाठी तातडीने निधी मिळावा म्हणून अध्यक्षाकडे प्राध्यान्याने प्रयत्न करणार आहे, असे समाजकल्याणच्या सभापती शिला शिवशरण यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com