उत्तरप्रदेशातील व्यक्तीची गोळी झाडून आत्महत्या

Uttar-pradesh suicide
Uttar-pradesh suicide

नगर : उत्तरप्रदेशातील एका इसमाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. अमृतलाल दुखीराम पाल (वय 42, रा. अलाहाबाद, उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने स्वतःच्या गळ्यावर मारून घेतलेली गोळी आरपार जाऊन पालचा जागीच मृत्यू झाला. तर आरपार गेलेली गोळी जवळ उभ्या असलेल्या एका महिलेच्या पोटाला चाटून गेल्याने ती महिलाही किरकोळ जखमी झाली आहे.

आज (शनिवारी) सकाळी साडे नऊ वाजता विळद (ता. नगर) येथील पाण्याच्या टाकीजवळ हा प्रकार घडला. अमृतलाल पाल हा आज सकाळी उत्तरप्रदेशातून नगरला आला होता. मूळची उत्तरप्रदेशातील राहीवासी आणि बऱ्याच दिवसापासून नगरला सहकुटूंब राहणाऱ्या एका महिलेवरील एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असल्याची शक्‍यता पोलिस व्यक्त करत आहेत. आत्महत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला कट्टा हा पाल याने उत्तरप्रदेशातूनच आणलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकाराची सखोल चौकशी केली जात असल्याचे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले. याप्रकाराने मात्र विळद परिसरात खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com