सातारा जिल्हा "शौचालययुक्‍त'कडे 

सातारा जिल्हा "शौचालययुक्‍त'कडे 

सातारा - स्वच्छ भारत अभियानात (ग्रामीण) अग्रेसर असलेली सातारा जिल्हा परिषद शंभर टक्‍के वैयक्‍तिक शौचालय उभारणीत काही पावलांवर येऊन ठेपली आहे. सध्या चार लाख 68 हजार 43 वैयक्‍तिक शौचालये उभारली असून, उर्वरित दोन हजार 963 शौचालये 15 मार्चपर्यंत उभारण्याचे उद्दिष्ट पाणी व स्वच्छता विभागाने घेतले आहे. 

सातारा जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत अभियानात देशपातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. तसेच हागणदारीमुक्‍त प्रमाणित जिल्हा करण्यात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्यानंतर स्वच्छता दर्पण मूल्यांकनामध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. केंद्र शासनाच्या पायाभूत सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील चार लाख 71 हजार सहा कुटुंबांपैकी चार लाख 68 हजार 43 कुटुंबांत आजवर वैयक्‍तिक शौचालये उभारण्यात आली आहेत. शिवाय, उरलेली कुटुंबे सार्वजनिक शौचालयांचा वापर करत आहेत. सातारा, माण, जावळी, महाबळेश्‍वरमध्ये 100 टक्‍के शौचालये उभारली आहेत. आता सात तालुक्‍यांतील उर्वरित दोन हजार 963 कुटुंबांत मार्चपर्यंत शौचालये उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. 

पाच वर्षांत अशी उभारली शौचालये ः सन 2013-14 मध्ये दहा हजार 815, 2014-15 मध्ये 20 हजार 782, 2015-16 मध्ये 20 हजार 872, 2016-17 मध्ये 51 हजार 947, 2017-18 मध्ये 20 हजार 57 इतक्‍या कुटुंबांत शौचालये उभारली गेली आहेत. ग्रामीण जिल्ह्यात 99 टक्‍के कुटुंबे वैयक्‍तिक, सार्वजनिक शौचालयांचा वापर करत आहेत, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी दिली. 

तालुकानिहाय उद्दिष्ट असे...  
खटाव 900, पाटण 869, फलटण 450, कऱ्हाड 308, कोरेगाव 267, 
वाई 126, खंडाळा 43. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com