मुलींच्या स्वच्छतागृहातील चित्रफीत व्हायरल केल्याचे उघडकीस

Marathi News West Maharashtra ITI College video viral
Marathi News West Maharashtra ITI College video viral

कऱ्हाड -  येथील आयटीआय (शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था) महाविद्यालयातील येथे मुलींच्या स्वच्छतागृह व शौचालयातील व्हिडीओ चित्रफीत व आॅडीओ रेकार्डींग करून ते व्हायरल केल्याचा प्रकार आज उघडकीस आला.

एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, अमीत जाधव, दिग्वीजय जाधव यांच्यासह संभाजी बिग्रेडचे शहराध्यक्ष भूषण पाटील, विनोद डुबल यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्राचार्य मिसाळ यांना घेराव घातला. या प्रकरणी चार विद्यार्थ्यांना निलंबीत केले आहे, अशी माहिती प्राचार्यांनी दिली. तरीही या प्रकरणात रितसर गुन्हा दाखल करा. तो दाखल होत नाही. तोपर्यंत प्राचार्यांच्या दालनातून उठणार नाही, अशी भुमिका संघटनेने घेतली. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. तीन तासापेक्षा जास्त काळ संघटनेचे पदाधिकारी व नेते तेथे बसून होते.

या प्रकरणाबाबत महाविद्यालयाने भक्कम भुमिका न घेतल्यास आज महाविद्यालय बंद करून देणार नाही. प्राचार्यांसह कोणालाच काम करून देणार नाही. असेही यावेळी संघटनेने जाहीर केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com