मुंबईहून आटपाडीकडे जाणाऱ्या बसला अपघात, दोन जखमी

BusAccident
BusAccident

फलटण (सातारा) : मुंबईहून आटपाडीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला वडजल (ता.फलटण) येथे अपघात झाला असून त्यामध्ये दोन प्रवासी जखमी झाले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून आटपाडीकडे जाणारी जे.डी. ट्रॅव्हल्स (एमएच 07 एडी 2121 ) ही वडजल ते वाठार फाटा येथे पहाटे चारच्या सुमारास महामार्गालगतच्या  पुलाच्या कठड्यास वेगाने धडकली. या भीषण धडकेत ती जागेवरच एका साईडला पलटी झाली. दरम्यान या आरामबसमध्ये मध्ये 30 प्रवासी होते.

याची माहिती मिळताच ग्रामीण  पोलीस घटना स्थळी पोहोचले. यावेळी रुग्णवाहिकेने जखमी प्रवाशांना फलटण येथील खाजगी रुग्णालयात आणले असून या मधील संतोष पवार (वय 36, रा.पवारवाडी वडूज,ता.खटाव ) व एक महिला जखमी झाली असून त्यांचे नाव समजले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com