पाल येथील खंडोबा यात्रा ३१ डिसेंबरला

संतोष चव्हाण
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

उंब्रज (ता. कऱ्हाड, जि. सातारा) - महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याचे आराध्य दैवत पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबाच्या यात्रेत मागील वर्षीप्रमाणेच आराखडा तयार आहे. किरकोळ बदल वगळता यात्रेचे मागील नियम पूर्ववत करण्यात आले आहेत. त्या उपाययोजना व नियमांची काटोकोरपणे अंमलबजावणी करावी, असा आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला.

उंब्रज (ता. कऱ्हाड, जि. सातारा) - महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याचे आराध्य दैवत पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबाच्या यात्रेत मागील वर्षीप्रमाणेच आराखडा तयार आहे. किरकोळ बदल वगळता यात्रेचे मागील नियम पूर्ववत करण्यात आले आहेत. त्या उपाययोजना व नियमांची काटोकोरपणे अंमलबजावणी करावी, असा आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला.

पाल येथील खंडोबा यात्रा ३१ डिसेंबरला सुरु होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची बैठक पाल येथे झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यात्रेच्या अनुषंगाने प्रशासन ग्रामस्थ व मानकरी यांची चर्चा झाली. पोलिस अधिक्षक संदीप पाटील, प्रांतधिकारी हिम्मत खराडे, प्रमुख मानकरी देवराज पाटील, तहसीलदार राजेंद्र शेळके, पोलीस उपधिक्षक नवनाथ ढवळे, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, सरपंच मुकुंद खडाईत, उपसरपंच उपस्थित होते.

श्रीमती सिंघल म्हणाल्या, प्रत्येक विभागाने यात्रा कालावधीत नेमलेल्या अधिकारी यांचे फोन नंबर प्रांतधिकारी यांच्याकडे द्यावेत. म्हणजे प्रत्येक विभागाला योग्य त्या सुचना करता येतील. स्वच्छतेच्या बाबतीत हयगय चालणार नाही.

ग्रामस्थांनी जी कामे सुचवली आहेत, ती यात्रेच्या अनुषंगाने महत्वाची आहेत. ती लवकरात लवकर संबधित विभागाने पूर्ण करावीत, असा आदेश प्रांतधिकारी खराडे यांनी दिला. जिल्हा पोलीस अधिक्षक पाटील म्हणाले, मानकऱ्याची संख्या वाढली आहे. प्रवेशासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व मर्यादित पास देण्यात येतील. कोणतीही घटना होवू नये यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागते. यात्रा उत्साहात व सुरक्षित पार पडण्यासाठी पोलिसांचे काम कडकच राहील.   

पार्कींग जागा व एसटी बस स्थानक तसेच खासगी वाहनांसाठी स्वतंत्र पार्कींग व्यवस्था आहे. मानकऱ्यांना वेगवेगळ्या रंगाचे पास दिले जातील. मिरवणूक मार्ग मोकळा राहण्यासाठी प्रयत्न करणारे पोलिस प्रशासन तत्पर राहणार असल्याचे पोलिस उपधिक्षक ढवळे यांनी सांगितले.

यावेळी बैठकीत तहसीलदार शेळके व गटविकास अधिकारी फडतरे यांनीही माहिती दिली. यात मंदिरासमोरील भाविकांची गर्दी तसेच पार्कींग मधील दुकाने, तारळी नदीपात्रातील पूल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोलिस बंदोबस्त मानकऱ्यांची व्यवस्था, वीज यासह अनेक मुद्यांवर तसेच यात्रा सुरक्षिततेच्या दृष्टीने उपस्थित झालेल्या विविध मुद्यावर चर्चा होऊन संबंधित विभागामार्फत उपाययोजना व चर्चा झाली. 

मार्च महिन्यापासून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापरावर बंदी करण्यात आली आहे. बचत गटाच्या महिलांना कापडी, कागदी पिशव्या शिवण्यासाठी काम द्यावे. दुकान व्यवसायिक यांनी प्लॅस्टिक पिशवी वापरू नये. यात्रेच्या कालावधीत कापडी पिशवी वापरावी, कचरा निर्मुलन करणे गरजेचे आहे. कचरा वेगवेगळ्या पध्दतीने गोळा करुन प्लॅस्टिक वेगळे गोळा करावे, प्रत्येक गावाने उपक्रम राबवून सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यात्रेकरुंना आव्हान केले आहे.

 

Web Title: Marathi News_Khandoba yatra to Pal on 31st December