नोटांबदीमुळे बाजारपेठ थंडावली

नोटांबदीमुळे बाजारपेठ थंडावली

उद्योग, व्यापारातील उलाढाल निम्म्यावर-चलन तुटवडा कायम
कोल्हापूर - नोटाबंदीमुळे दैनंदिन उद्योग व्यापारासह, हॉटेल व्यावसायिक अशा सर्वच क्षेत्रांतील उलाढाल निम्म्यावर आली आहे. उद्योग, व्यापार, हॉटेल व्यावसायिक अशा सर्वच घटकांना फटका बसला आहे. चलन तुटवड्यामुळे बॅंका तसेच एटीएमसमोरील रांगा अद्यापही कायम आहेत. पूर्वी संपामुळे एक दिवस जरी बॅंका बंद राहिल्या तरी दररोजची पाचशे कोटींची उलाढाल ठप्प व्हायची.  

व्यवहार कधी एकदा सुरळीत होतील, याकडे उद्योग व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शेतात घाम गाळून पिकविलेला भाजीपाला कवडीमोल दराने विकण्याच्या वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोबी, वांगी, मेथी, पालक, पोकळा, टोमॅटो यांचे दर कमालीचे घसरले आहेत. पूर्वी भाजी खरेदीसाठी लोकांना मंडईत जावे लागत होते. आता किरकोळ विक्रेते मुख्य रस्त्यावर जागा दिसेल तेथे बसून भाजीपाला विकू लागले आहेत. नाशवंत वस्तू असल्याने माघारी नेता येत नसल्याने आणखी पंचाईत झाली आहे. दोन हजारांच्या नोटेमुळे बाजारपेठेत वांदे झाले आहेत. हॉटेल व्यावसायिक, धान्य व्यापार, फळे, सराफ बाजार, किराणा माल या क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या, मात्र तितक्‍या प्रमाणात नवे चलन न आल्याने दूरगामी परिणाम बाजारेपेठेवर जाणवत आहेत. मार्केट यार्ड येथे शेतीमाल पडून आहे. शहरातील मंडईत हा शेतीमाल आणला तर तो घ्यायला कुणी तयार नाही. मुळात शेतकऱ्यांनी आणलेली भाजीच कवडीमोल दराने जात असल्याने मार्केट यार्डातील भाजी कोण घेणार, असा प्रश्‍न आहे.

या महिन्याचा पगार वेळेत जमा झाला, मात्र बॅंकेत पाच हजारांच्या वरती रक्कम मिळत नाही. पेन्शनर लोकांना दोन हजार कसेबसे हाती पडले. बाजारात चलन फिरण्याची व्यवस्था बंद झाली आहे. पाचशे हजारांच्या जुना नोटा स्वीकारणे बंद झाले आहे. हॉटेलमध्ये जायचे म्हटले तर किमान हजार दीड हजारापर्यंत बिल व्हायला हवे. तसे झाले तरच दोन हजारांचे सुट्टे मिळतात. 

रिझर्व्ह बॅंक पैसे पाठविणार मग ची करन्सी चेस्टमध्ये जमा होणार तेथून बॅंका आणि एटीएममध्ये जमा होणार, असा प्रवास जर तर अवलंबून आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसह, कॉर्पोरेट कंपन्यातील कर्मचारी. जिल्हा परिषद. दुधाचे बिल रक्कम खात्यावर अडकून पडली आहे. जिल्हा बॅंक आणि तसेच नागरी सहकारी बॅंकात सामान्यातील सामान्य नागरिकांची खाती आहे. बॅंकांच्या व्यवहावर निर्बंध आणले आहेत. पाचशे हजारांच्या नोटा सहकारी बॅंकानी स्वीकारल्या मात्र त्या बदल्यात नवे चलन उपलब्ध झाले नाही. 

वस्तुस्थिती मात्र वेगळी
केंद्र सरकारची कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने वाटचाल असताना वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे, रोखीच्या व्यवहारावर दैनंदिन व्यवहार चालतात. धनादेश आरटीजीएस डिमांड ड्राफ्ट असे व्यवहार करणाऱ्यांची संख्या कमी आहे. आजचा शनिवार आणि रविवारही एटीएमच्या रांगेत जाईल, असेच शहरातील चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com