शहीद जवान तुपारेंवर आज अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

कोवाड - लेह लडाखमध्ये सेवा बजावताना शहीद झालेल्या महिपाळगड (ता. चंदगड) येथील जवान महादेव पांडुरंग तुपारे यांच्या मृत्यूने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. गुरुवारी जवान तुपारेंच्या मृत्यूची बातमी समजली. तेव्हापासून कुटुंबीयांबरोबरच गावकऱ्यांना जवान महादेवच्या पार्थिवाची प्रतीक्षा आहे. उद्या (ता. १२) सकाळी पार्थिव गावात येणार आहे.

शिवराज हायस्कूलच्या पटांगणावर अंत्यविधीचा कार्यक्रम करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले आहे. तहसीलदार आप्पासाहेब समींदर व पोलिस निरीक्षक महावीर सकळे अंत्यदर्शनाच्या तयारीची पाहणी करून सूचना देत होते. उद्या पहाटे महादेवचे पार्थिव महिपाळगड येथे पोचणार असल्याचे समजते. गावातील सर्व रस्ते ग्रामस्थांनी स्वच्छ केले आहेत. कमानी तयार करून पताका बांधल्या आहेत. महिलांनी सकाळी दारातून सडा रांगोळीचे नियोजन केले आहे. देवरवाडी व महिपाळगड येथील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फलक लावून जवान महादेवला श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, आज आमदार अमल महाडिक, माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

Web Title: martyr jawan tupare cremated today