मायणीत खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी!

संजय जगताप
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मायणी - सरपंच निवडणूक थेट जनतेमधून होणार असल्यामुळे सरपंचपदासाठी इच्छुकांच्या उड्यावर उड्या पडत आहेत. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी... म्हणत अनेकांकडून प्रभागातील उमेदवारीकडे तोंड फिरवले जात आहे. नाना तऱ्हेने कुरघोड्या करीत प्रभागातील उमेदवारीची माळ इतरांच्या गळ्यात टाकण्यासाठी नेत्यांचे मन वळवण्यासह, फिल्डिंग लावली जात आहे. परिणामी येथील गुदगे व येळगावकर या दोन्ही गटांकडून उमेदवारांच्या अंतिम यादीस विलंब होत आहे. 

येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंच निवडून देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवाराला कोणत्याही पक्षाच्या चिन्हाचा आधार घ्यावा लागणार नाही. तरीही येथे स्वतंत्रपणे सरपंचपदासाठी अराजकीय उमेदवार उभे राहण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे थेट जनतेतून जरी निवडून द्यायचे असले तरी गुदगे किंवा येळगावकर या गटांचा आधार घेतल्याशिवाय उमेदवार सरपंचपदी निवडून येऊच शकत नाही. राजकीय गटांपासून अलिप्त असलेल्या, सामाजिक कार्याची आवड 

गुप्तहेर, खबरे नेत्यांच्या सेवेला
उमेदवारी देताना आधीच स्थानिक नेत्यांच्या नाकीनऊ येत असताना विरोधकांकडून कोणते उमेदवार असतील, याचा अंदाज बांधण्यासाठी काही गुप्तहेर, खबरे नेत्यांच्या सेवेला आहेत. त्यामुळे राजकीय शह-काटशह देणे सुलभ होत आहे.

Web Title: mayani satara news grampanchyat election