महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ विजयी

Mayor Cup Football Competition Dilbahar Talim Won
Mayor Cup Football Competition Dilbahar Talim Won

कोल्हापूर : महापौर चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळाने (अ) साईनाथ स्पोर्ट्सवर ५-० ने विजयाची नोंद केली. बालगोपाल तालीम मंडळाने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाला ३-० ने पराभूत केले. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले.

बालगोपाल विरुध्दच्या सामन्यात ऋणमुक्तेश्वरच्या खेळाडूंनी नांगी टाकली. दिलबहारला (ब) नमवल्याने ऋणमुक्तेश्वरचा आत्मविश्वास जरुर दुणावला होता. मात्र, बालगोपालच्या दमदार खेळाडूंपुढे त्यांना केवळ बचाफळी मजबूत ठेवण्यावर भर द्यावा लागला. बालगोपालकडून बबलू नाईकने १० व्या मिनिटाला गोल केल्यानंतर चिकू इबेरेने ३० व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल नोंदवला. उत्तरार्धात रोहित कुरणेने ६० व्या मिनिटाला निर्णायक गोल नोंदवला. ऋणमुक्तेश्वरकडून तुषार पुनाळकर व सोमनाथ पाडळकर यांनी केलेल्या चढाया बालगोपालच्या बचाफळीने वेळीच रोखल्या.

दिलबहारने पूर्णवेळेत पाच गोलची नोंद केली असली तरी त्यांच्या खेळाडूंनी गोलच्या अनेक संधी दवडल्या. दिलबहारकडून विकी सुतार याने ७ व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर करण चव्हाण-बंदरे, निखिल जाधव, सचिन पाटील यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गोलची नोंद होऊ शकली नाही.

निखिलला ३१, करण ३४ व्या मिनिटाला गोल करता आला. उत्तरार्धात विकीने ५३ व  करणने ५७ व्या मिनिटाला गोल केला. साईनाथकडून अवधूत गुरव, श्रीकांत पुजारी, अश्विन टाकळकर, सतीश खोत, प्रथमेश पाटील यांनी चांगला खेळ केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com