नगराध्यक्षपदासह पंधरा जागा कमळ चिन्हावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

कुरूंदवाड - येथील पालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिवशाही आघाडी यांची आघाडी झाली असून भाजप नगराध्यक्षपदासह पंधरा जागा कमळ चिन्हावर, तर दोन जागावर शिवशाही आघाडीचे उमेदवार असणार आहेत. अशी माहिती भाजप नेते डॉ. संजय पाटील, ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे व शिवशाही आघाडीचे प्रमुख शानूर मुजावर यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी पक्ष निरीक्षक अशोक देसाई उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले,""शहरात पक्षाची बांधणी चांगली असून जनाधारही वाढत चालला आहे. अनेक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाची केंद्र व राज्यात सत्ता असून विकासाचा अजेंडा आहे. त्यामुळे भविष्यात पालिकेला भरीव निधी मिळून विकासाची गंगा वाहणार आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्यात येत आहे, असे सांगून डॉ. पाटील म्हणाले, शहरात 24 तास राजकारण व समाजकारणाला वाहून घेतलेले नेतृत्व म्हणून रामचंद्र डांगे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल व ते निवडून येतील असा विश्‍वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.''

केंद्र व राज्यात स्वाभिमानी भाजपसोबत आहे. इथेही ते सोबत यावे अशी आमची भूमिका असून त्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगून डॉ. पाटील म्हणाले, ""शानूर मुजावर यांची शिवशाही आघाडी भाजपसोबत आहे. त्यांना दोन जागा सोडण्यात येतील शिवाय अन्य समविचारी आघाड्यांना सोबत घेऊ.''
पालिका स्थापनेनंतर प्रथमच भाजप पालिका निवडणूक चिन्हावर लढवित आहे. पक्षाची ताकद वाढली असून जुने व नवे असा वाद नाही. सर्वांना संधी मिळेल असे डॉ. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भीमशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ मधाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून प्रभाग आठ मधून त्यांची उमेदवारी निश्‍चित आहे. शानूर मुजावर म्हणाले,""भाजप सर्वांना सोबत घेऊन जाणारा व विकासाला महत्त्व देणारा पक्ष असल्याने आपण भाजपला प्राधान्य दिले आहे. शहराच्या राजकारणातील संगीत खुर्चीचा खेळ आपल्याला थांबवायचा आहे. त्यामुळे भाजपसोबत आघाडी केल्याचे सांगितले.'' यावेळी अजय भोसले, उदय डांगे उपस्थित होते.

Web Title: Mayor election with lotus symbol