राष्ट्रवादीकडून फरास, खेडकर, गवंडी इच्छुक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - महापौर अश्‍विनी रामाणे यांची वर्षाची कारकीर्द पूर्ण होत आल्याने पंधरा दिवसांत त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्‍यता आहे. दोन्ही कॉंग्रेसमध्ये सत्तेसाठी झालेल्या तडजोडीनुसार आता हे पद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. या पक्षाकडून हसीना बाबू फरास, अनुराधा सचिन खेडकर आणि माधवी प्रकाश गवंडी यांची नावे चर्चेत आहेत, तर विरोधी भाजप -ताराराणी आघाडीकडूनही ही निवडणूक लढविली जाणार आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र आली आहे.

कोल्हापूर - महापौर अश्‍विनी रामाणे यांची वर्षाची कारकीर्द पूर्ण होत आल्याने पंधरा दिवसांत त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्‍यता आहे. दोन्ही कॉंग्रेसमध्ये सत्तेसाठी झालेल्या तडजोडीनुसार आता हे पद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. या पक्षाकडून हसीना बाबू फरास, अनुराधा सचिन खेडकर आणि माधवी प्रकाश गवंडी यांची नावे चर्चेत आहेत, तर विरोधी भाजप -ताराराणी आघाडीकडूनही ही निवडणूक लढविली जाणार आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र आली आहे. इतर राज्यांतील काही संदर्भही तपासून बेरजेचे राजकारण करण्याचा भाजप-ताराराणी आघाडीचा प्रयत्न असेल, तर बहुमत टिकविण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे महापौरपदाची ही निवडणूकही लढवेधी ठरण्याची शक्‍यता आहे. 

गतवर्षी ऑक्‍टोंबर 2015मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. यात कॉंग्रेसला 27, राष्ट्रवादीला 15, ताराराणी आघाडीला 19 आणि भाजपला 14, तर शिवसेनेला 4 जागा मिळाल्या. निवडून आलेल्या तीन अपक्षांपैकी एकाने भाजप-ताराराणी आघाडीला, तर दोघांनी कॉंग्रेस आघाडीला पाठिंबा दिला आहे. दोन्ही कॉंग्रेसचे मिळून 44 संख्याबळ आहे, तर भाजप-ताराराणी आघाडीकडे 34 संख्याबळ आहे. कॉंग्रेसच्या अश्‍विनी रामाणे यांच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होणार आहे. राष्ट्रवादीकडून तिघी इच्छुक आहेत. यामध्ये हसीना फरास, अनुराधा खेडकर, माधवी गंवडी यांचा समावेश आहे. इतर मागासवर्ग महिला या प्रवर्गासाठी हे आरक्षण आहे. 

स्थायीतही चढाओढ 
जानेवारीमध्ये स्थायी समिती सभापतिपदासाठीही निवडणूक होईल. सध्या विरोधी आघाडीपेक्षा एकच मत सत्ताधाऱ्यांकडे जास्त आहे. त्यामुळे स्थायी सभापती निवडीतच सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याचा प्रयत्न राहणार आहे. हे पद आता राष्ट्रवादीकडे आहे. ते आता कॉंग्रेसच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतिपदासाठीही कॉंग्रेसमध्ये फिल्डिंग लावायला सुरवात आहे. 16 सदस्यसंख्या असलेल्या स्थायी समितीत कॉंग्रेसचे 5, ताराराणी आघाडीचे 4, राष्ट्रवादीचे 3, भाजपचे 3, शिवसेनेचा 1 असे संख्याबळ आहे. स्थायीसाठी कॉंग्रेसकडून सध्या तरी राहुल माने यांच्या नावाची चर्चा आहे.

पश्चिम महाराष्ट्र

पुणे / कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपची सत्ता राहील, असे विधान नुकतेच...

04.33 PM

सोलापूर : देवेंद्र फडणवीस होश मे आओ, पोलिस होश मे आओ, शाहू-फुले-आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर या घोषणा देत सोलापुरातील समविचारांनी...

03.33 PM

कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुर्नर्विकास योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपातून आपली सुटका...

02.06 PM