हद्दवाढविरोधी कृती समितीची उद्या बैठक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

18 गावांची विकास प्राधिकरणासंबंधी भूमिका जाणून घेणार

18 गावांची विकास प्राधिकरणासंबंधी भूमिका जाणून घेणार
कोल्हापूर - हद्दवाढविरोधी कृती समितीतर्फे रविवारी (ता. 23) सकाळी 11 वाजता 18 ग्रामपंचायतींची प्राधिकरणासंबंधी भूमिका समजावून घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामधाम येथे ही बैठक होणार आहे. हद्दवाढीचे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेले. त्यांनी हद्दवाढ समर्थक व हद्दवाढ विरोधक यांना एकत्र घेऊन बैठक घेतली. गुंता सोडवण्याचा एक पर्याय म्हणून 18 गावांत प्राधिकरण आणण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला. समितीने या निर्णयाचे स्वागत करून विचार करून अंतिम निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले होते.
दरम्यानच्या काळात हद्दवाढविरोधी कृती समितीने ग्रामपंचायतींना भेट देऊन चर्चा करून पत्रके काढून प्राधिकरणाची संकल्पना समजावून दिली. त्यानंतर ग्रामपंचायतीची भूमिका नेमकी काय, त्यांच्या अडचणी, तक्रारी काय आहेत. शासनाला द्यावयाचा ठराव यासंबंधी चर्चेसाठी रविवारी बैठक होणार असल्याचे निमंत्रक नाथाजी पोवार यांनी सांगितले.

बैठकीत चचर्चेनंतर नेमकी भूमिका स्पष्ट करून पुढे काय निर्णय घ्यायचा, याचीही चर्चा होणार आहे. या बैठकीला 18 गावांचे पदाधिकारी, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर आदी उपस्थित रहाणार आहेत. या बैठकीला उपस्थित राहून ग्रामपंचायतीची योग्य ती भूमिका मांडावी, असे आवाहन पोवार यांनी केले आहे.

टॅग्स

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर - "जहॉं हम खडे होते हैं लाईन वहीं से शुरू होती है,' अमिताभ बच्चन यांचा "कालिया' चित्रपटातील हा फेमस डायलॉग....

06.03 AM

मिरज - मिरजेतून सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर मार्गावर लोकल सोडण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. पुण्याहून पहिली...

05.48 AM

कोल्हापूर - बायोमेट्रिक हजेरीने महापालिका कर्मचाऱ्यांची चांगलीच झोप उडविली आहे. सकाळी सहाच्या ठोक्‍याला हजेरी, नाही तर...

05.03 AM