एमएचटी-सीईटीला भरभरून प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

कोल्हापूर - अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी १४ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) आज दिली. शहरातील पन्नास केंद्रांवर बैठक व्यवस्था केली होती. परीक्षेसाठी एकूण १५ हजार ७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  

शासन अनुदानित व खासगी विना अनुदानित महाविद्यालयांच्या अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा होती. सकाळी दहा वाजता पेपर सुरू होणार असल्याने केंद्रांवर सकाळी नऊपासूनच विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. शहरातील विवेकानंद महाविद्यालय, न्यू कॉलेज, महाराष्ट्र हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल आदी केंद्रावर बैठक व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी दहा ते साडे अकरा, साडे बारा ते दोन व तीन ते साडे चार या वेळेत  गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रचे पेपर प्रत्येकी शंभर गुणांसाठी झाले. गतवर्षी सुमारे तेरा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची माहिती परीक्षेचे जिल्हा संपर्क अधिकारी एस. एस. बिर्जे यांनी दिली.