कोल्हापूरात दूध संकलन 100 टक्के बंद 

सुनील पाटील
सोमवार, 16 जुलै 2018

कोल्हापूर : गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे यासाठी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला सकाळी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सहा हजारहून अधिक दूध संस्था आणि दूध संघांनी संकलन बंद ठेवून याला पाठिंबा दिला. गोकुळ दूध संघाने 11 लाख 50 हजार लिटरचे संकलन बंद केले. याला कोल्हापूरातील 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. सकाळी साडेनऊपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संकलन शंभर टक्के बंद राहिले. 

कोल्हापूर जिल्ह्यातील गावा-गावात पहाटे चार ते पाच दरम्यान दूध संस्थांचा भोंगा (सायरण) वाजतो. यावेळी शेतकऱ्यांची गाय व म्हैस दूध काढण्याची लगबग सुरू होते. आज मात्र एकाही संस्थेचा भोंगा किंवा सायरण वाजला नाही. जिल्ह्यात गोकुळसाठी दूध संकलन करणाऱ्या 5 हजार 500 संस्था आहेत. तर, इतर संस्थांसाठी दिड ते दोन हजार संस्था आहेत. या सर्व संस्थांनी दूध संकलन बंद ठेवले आहे. कोल्हापूरातुनच सुरू झालेल्या दूध आंदोलनामूळे एक टॅंकर किंवा टॅंम्पो सकाळपर्यंत अडवलेला किंवा दूध रस्त्यावर ओतलेले दिसले नाही. 

दूध बंद आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळाले पाहिजेत. यासाठी, गोकुळने आजचे सर्व दूध संकलन बंद ठेवले आहे. दूध संकलन बंद राहणार याबाबत दोन दिवसापूर्वीच सर्व संस्थांना कळविले आहे. 
- विश्‍वास नारायण पाटील, अध्यक्ष, गोकुळ दूध संघ (कोल्हापूर) 

Web Title: milk agitation 100 percent milk close down in kolhapur