#MilkAgitation दुग्ध व्यवसायाला १३ कोटींचा फटका

Milk
Milk

कऱ्हाड - दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांनी डेअरी व संघांना दूध घातले नाही. परिणामी सहकारी व खासगी दूध संघाचे संकलन गेल्या चार दिवसांपासून आटले आहे. जिल्ह्यात चार दिवसांत तब्बल ६७ लाख २० हजार लिटरवर दूध संकलन झाले नाही. त्यामुळे सुमारे १२ कोटी ७६ लाख ९१ हजार ४०० रुपयांचे नुकसान संघ व संस्थांना सोसावे लागून दूध व्यवसायातील उलाढाल ठप्प झाली आहे. 

दूध दरवाढीचे आंदोलन सुरू झाल्यापासून गावागावांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावांतील शेतकऱ्यांनीही दुधाला चार पैसे जादा मिळतील, या आशेने आंदोलनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेक दूध संघांनीही या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एक दिवस संकलन बंद ठेवले होते. आज सलग चौथ्या दिवशीही अनेक गावांतील शेतकऱ्यांनी दूध आंदोलनाला पाठिंबा देत डेअरींना दूध घातले नाही. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला असला आणि प्रशासनाने दूध संघांना जरी संकलन सुरू ठेवण्याचे सांगितले असले, तरीही दूध संघांनीही आंदोलनाच्या धास्तीने अंदाज घेतच संकलन सुरू ठेवले आहे. 

या आंदोलनामुळे सहकारी दूध संघ व खासगी दूध डेअरींकडे येणाऱ्या दुधामध्ये मोठी घट झाली आहे. दूध संघाकडे सोमवारी (ता. १६) १५.३३ टक्के, मंगळवारी (ता. १७) २१.९२ टक्के, बुधवारी (ता. १८) २८.४८ टक्के दुधाचे संकलन झाले. त्यामुळे लाखो लिटर दुधाची आवकच संघाकडे झाली नाही. कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com