मिरजेत कॉंग्रेसची उमेदवार यादी जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

मिरज - कॉंग्रेसने मिरज तालुक्‍यासाठी उमेदवारांची यादी आज जाहीर केली. ती अशी - गट - भोसे - मनीषा दत्तात्रय पाटील, एरंडोली - जयश्री तानाजी पाटील, बेडग - रुबाब किसन जाधव, कवलापूर - निवास पांडुरंग पाटील, बुधगाव - सुजाता प्रतापसिंह पाटील, कसबे डिग्रज - विशाल श्रीपाल चौगुले. म्हैसाळची जागा राष्ट्रवादीसाठी सोडली. समडोळी व कवठेपिरान शेतकरी संघटना, मालगाव स्वाभिमानी विकास आघाडी व आरगची जागा स्थानिक आघाडीसाठी सोडली. 

गण - सोनी - रंगराव धोंडिराम जाधव, भोसे - कृष्णदेव महादेव कांबळे, एरंडोली - माधवी पोपट मलमे, सलगरे - सुवर्णा बाळासाहेब कोरे, बामणोली - सतीश बाबूराव कोरे, कवलापूर - पूनम महेश कोळी, माधवनगर - छाया दिनकर हत्तीकर, बुधगाव - अनिल बाबासाहेब डुबल, कसबे डिग्रज - अजित बच्चाराम काशीद, कवठेपिरान - अनिल शिशुपाल आमटवणे, समडोळी - संजय रामचंद्र सावंत, इनामधामणी - मालुश्री विठ्ठल पाटील, टाकळी - इराप्पा भिमू पुजारी, म्हैसाळ - दौलतराव दिलीपराव शिंदे. खटाव आणि आरगच्या जागा स्थानिक आघाडीसाठी सोडल्या आहेत. नरवाड व बेडगच्या जागा राष्ट्रवादीसाठी तर गुंडेवाडी व मालगाव स्वाभिमानी विकास आघाडीला दिल्या आहेत. नांद्रेतही स्थानिक आघाडीच्या विरुद्ध उमेदवार दिलेला नाही. दुधगावची जागा शेतकरी संघटनेसाठी सोडली आहे. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. 

पक्षाने सोयीनुसार युती केल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीसोबत सर्वच ठिकाणी युतीची बोलणी यशस्वी ठरली नाहीत. फक्त बेडग गटात हातमिळवणी झाली. म्हैसाळ, बुधगाव, कवलापूर आणि एरंडोली जागा स्वबळावर लढणार आहेत. पश्‍चिम भागात दुधगाव गण, कवठेपिरान व समडोळी गट या जागा शेतकरी संघटनेसाठी सोडाव्या लागल्या. मालगाव, आरगमध्ये भाजपविरोधात आघाडी झाल्याने कॉंग्रेसने तेथून माघार घेतली. 

Web Title: Miraj Congress candidate list announced