मिरज येथे 21 सप्टेंबरपासून अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

मिरज - येथील ग्रामदैवत अंबाबाईचा नवरात्र संगीत महोत्सव 21 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. विख्यात गायिका गौरी पाठारे उद्‌घाटन करतील. महोत्सवाची देदीप्यमान परंपरा कायम ठेवत यंदाही अनेक नामवंत आणि दिग्गज कलाकार संगीत सेवा करणार आहेत. 

उद्‌घाटनानंतर पाठारे यांचे शास्त्रीय गायन होईल. प्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर यांना यंदाचा संगीतकार राम कदम पुरस्कार देण्यात येणार आहे. 22 ला महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. राम कदम यांचे पुत्र विजय कदम उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी केळकर यांचे गायनही होईल. 

यंदाच्या डॉ. अब्बन मेस्त्री पुरस्कारासाठी उदयोन्मुख तबलावादक धनश्री नागेशकर (मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे. सहायक धर्मादाय आयुक्त महावीर जोगी यांच्या हस्ते 23 ला पुरस्कार प्रदान केला जाईल. नागेशकर यांचे सोलो तबलावादन व पं. सुहास व्यास यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. 24 ला वरदा बेडेकर (गोवा) यांचे कथक नृत्य, रेवा नातू (पुणे) यांचे शास्त्रीय गायन होईल. 25 ला निनाद दैठणकर (पुणे) यांचे संतुरवादन आणि समीर अभ्यंकर (मुंबई) यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. 26 ला मंगला जोशी (सांगली), सप्तश्री हाजरा (कोलकत्ता) आणि पौर्णिमा कुलकर्णी (बेंगळुरू) यांचे गायन होईल. 27 ला धनंजय जोशी (नांदेड) यांचे गायन, नॅश नॉबर्ट (अमेरिका) यांचे बासरीवादन होणार आहे. 28 ला केतकी बेडेकर (मिरज) यांचे भरतनाट्यम्‌, विश्‍वेश भोसले व वेदांत बेडेकर (मिरज) यांचे तबलावादन, शीतल कौलवकर व शिष्या (पुणे) यांचा कथक नृत्याविष्कार आणि पं. ह्रषीकेश बोडस (मिरज) यांचे गायन होईल. 29 सप्टेंबरला महोत्सवाची सांगता होणार आहे. कृष्णेंद्र वाडीकर (हुबळी) यांचे गायन व कौस्तुभ देशपांडे यांचा "आनंदतरंग' ही मराठमोळ्या गाण्यांची मैफल होईल. सर्व कार्यक्रम अंबाबाई मंदिर प्रांगणात सायंकाळी सहाला सुरू होणार आहेत. 

महोत्सव समितीचे अध्यक्ष मधुभाऊ पाटील-मळणगावकर, शेखर करमरकर, विनायक गुरव, संभाजी भोसले, श्रीकांत यडुरकर, बाळासाहेब मिरजकर, मज्जीद सतारमेकर, दीपक गुरव, श्रीकांत गुरव यांनी ही माहिती दिली. 

प्रथमच विदेशी कलाकार सहभागी 
संगीत महोत्सवाच्या 62 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखादा विदेशी कलाकार सहभागी होत आहे. नॅश नॉबर्ट हे अमेरिकी बासरीवादक कलाकार 27 सप्टेंबरला बासरीवादन करतील. 1999 पासून ते भारतात संगीताचा अभ्यास करीत आहेत. पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे ते शिष्य आहेत. संगीत महोत्सवासाठी निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या एकाला यंदापासून श्री अंबाबाई सेवा पुरस्कार देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. पहिल्या पुरस्कारासाठी मंडप व्यावसायिक सुभाष सव्वाशे यांची निवड झाली आहे. 

Web Title: miraj news Navaratri Music Festival