‘भोकरे इन्स्टिट्यूट’मध्ये आज शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास, गायकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

मिरज - दहावी-बारावीनतंरच्या भवितव्याबाबत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी  शनिवारी (ता. २७) रोजी संजय भोकरे इन्स्टिट्यूटतर्फे ‘इंजिनिअरिंग करिअर गाईडन्स’ कार्यशाळा होणार आहे. 

या कार्यशाळेमध्ये बंगळूरच्या अंतराळ संशोधन केंद्रातील (इस्रो)ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एच. एल. श्रीनिवास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्‍नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक सुमंत कुलकर्णी यांनी दिली. 

कुलकर्णी म्हणाले, ‘‘सध्या इंजिनिअरिंग शाखेचे शिक्षण आणि त्यातील भवितव्याबद्दल खूपच गैरसमज पसरू लागलेत. याबाबत देशासह जगातील इंजिनिअरिंगची स्थिती, रोजगाराच्या संधी आणि त्यातही अंतराळ संशोधन क्षेत्रात इंजिनिअरिंगची असलेली गरज याची सविस्तर माहिती या कार्यशाळेत दिली जाणार आहे. डॉ. गायकर हे ‘अभियांत्रिकी शिक्षणाचे फायदे आणि भविष्यातील संधी’ विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. अंतराळ संशोधन क्षेत्रात कार्यरत डॉ. श्रीनिवास हेही पीसीबी तयार करण्यापासून ते उपग्रह प्रक्षेपणाच्या प्रत्येक टप्प्यावर असलेली अभियंत्यांची गरज आणि सद्य:स्थिती याची माहिती विद्यार्थ्यांना देणार आहेत.पत्रकार श्रीराम पचिंद्रे उपस्थित राहणार आहेत. इंजिनिरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येईल.