शिवसेनेशिवाय भाजप सत्तेत...हरकत नाय !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

विटा - सांगली झेडपीत शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजपची सत्ता येत असल्यास माझी काहीही हरकत नाही. भाजप जिल्हास्तरीय नेत्यांचे वक्तव्य आश्‍चर्यकारक आहे. शिवसेनेला धरून अथवा सोडून झेडपीत सत्ता स्थापनेसंदर्भात कोणतीही परिस्थिती निर्माण झालेली नाही. भाजप नेत्यांचे ‘ते’ वक्तव्य संभ्रम निर्माण करणारे आहे. माझी भूमिका तळ्यात-मळ्यात नसते, मी भूमिका विचारपूर्वक घेतो, अशी स्पष्ट भूमिका आमदार अनिल बाबर यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली. 

शिवसेनेच्या पाठिंब्याशिवायही भाजपाचे संख्याबळ ३४ पर्यंत पोचल्याचे वक्तव्य जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी मिरजेत केले. त्यावर श्री. बाबर बोलत होते.

श्री. बाबर म्हणाले, ‘‘भाजपाच्या नेत्यांचे वक्तव्य संभ्रम निर्माण करणारे आहे. अपवादात्मक, अपरिहार्यतेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा  गैरफायदा घेण्याचा आमचा स्वभाव नाही. मी विवेकाचे भान ठेवून विचार आणि विकासाचे राजकारण केले. कोणाला तरी बरे वाटावे म्हणून मी वक्तव्य करीत नाही. झुलवायचे आणि फसवायचे हा स्वभावही नाही. जय-पराजय या गोष्टी पचवायची सवय आहे. विकासासाठी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. शिवसेनेचे तिन्ही सदस्य सक्षमपणे काम करतील. सत्ता स्थापनेबाबत भाजपा नेत्यांचा माझ्याशी संपर्क झालेला नाही. भाजपाशिवाय जे सत्ता स्थापन्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांनाही शब्द दिलेला नाही. स्वार्थासाठी मी तत्त्वाशी तडजोड करीत नाही.’’

Web Title: mla anil babar