आमदार गोरेंना न्यायालयाची 2 जानेवारीपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

सातारा- येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आमदार जयकुमार गोरे यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली. त्यामुळे सध्या तरी गोरे यांची अटक टळली आहे.

विनयभंग आणि अश्लील पोस्ट टाकल्याप्रकरणी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी गोरेंनी केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी काल फेटाळला. दरम्यान उच्च न्यायालयात जाण्यासाठी अंतरिम जामीन मिळावा यासाठी गोरे यांच्या वतीने न्यायालयाकडे पुन्हा विनंती अर्ज करण्यात आला होता. 

या सुनावणीच्या निकालावर गोरेंची अटक अवलंबून होती. शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील अटकेच्या तयारीत होते. त्या अर्जावर काल दोन तास दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी सुनावणी आज (मंगळवार) ठेवली होती. गोरेंना हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश होते. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात अर्ज करण्यासाठी 2 जानेवारीपर्यंतची मुदत दिली.