आमदार जयकुमार गोरेंची पोलिस ठाण्यात शरणागती

राजेश सोळस्कर
मंगळवार, 10 जानेवारी 2017

व्हॉट्‌सऍपवरून अश्‍लिल मेसेज पाठवून तसेच शरीरसंबंधांची मागणी करून गोरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार येथील एका महिलेने शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

सातारा - विनयभंग व व्हॉट्‌सऍपवर अश्‍लील पोस्ट टाकल्याच्या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयानेही फेटाळल्यानंतर आज (मंगळवार) आमदार जयकुमार गोरे यांनी पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली.

जयकुमार गोरे यांना सर्वोच्च न्यायालयात अपील करेपर्यंत अटकेला मुदत मिळण्याचा अर्जही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी फेटाळला होता. त्यामुळे गोरे अडचणीत आले. निर्णयानंतर गोरे यांना आता अटकेपासून मिळालेले संरक्षण आज संपुष्टात आले. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी गोरे यांच्या अटकेसाठी फास आवळायला सुरवात केली होती. दरम्यान आज सकाळीच शहर पोलिस ठाण्यात त्यांनी शरणागती पत्करली.

व्हॉट्‌सऍपवरून अश्‍लिल मेसेज पाठवून तसेच शरीरसंबंधांची मागणी करून गोरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार येथील एका महिलेने शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

Web Title: MLA Jaykumar Gore Surrendered at police station