आ. संग्राम जगताप यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले आमदार संग्राम जगताप यांच्यासह तिघांना 14 दिवासांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर, बीएम उर्फ भानुदास कोतकर अशी त्यांची नावे आहेत. केडगाव येथील शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासह सात जणांना अटक केली. त्यातील आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर, बीएम उर्फ भानुदास कोतकर अकरा दिवस पोलिस कोठडीत होते.

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले आमदार संग्राम जगताप यांच्यासह तिघांना 14 दिवासांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर, बीएम उर्फ भानुदास कोतकर अशी त्यांची नावे आहेत. केडगाव येथील शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासह सात जणांना अटक केली. त्यातील आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर, बीएम उर्फ भानुदास कोतकर अकरा दिवस पोलिस कोठडीत होते. त्यांच्या शेवटच्या दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. 

"गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक होईपर्यंत वरील तीनही आरोपींची पोलिस कोठडीची मुदत राखीव ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी,'' अशी मागणी तपासी अधिकारी निरीक्षक दिलीप पवार यांनी केली. प्रथम वर्ग न्यायालयाने पोलिस कोठडीची मुदत राखून ठेवत तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सीमा देशपांडे यांनी काम पाहिले. 

गिऱ्हे, गुंजाळ उद्या न्यायालयात 
गुन्ह्यातील मुख्य आरोपी संदीप गुंजाळ आणि आरोपीला गावठी पिस्तूल पुरविणारा आरोपी बाबासाहेब केदार यांची उद्या पोलिस कोठडी संपत आहेत. तर, आरोपी संदीप गिऱ्हे, महावीर मोकळे यांचीही उद्या कोठडी संपत असल्याने वरील चौघांना उद्या दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

Web Title: mla sangram jagtap in judicial custody