मोबाईल ऍपद्वारे तिकीट खरेदीची 10 रेल्वे स्थानकांवर सुविधा

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 18 मे 2017

कॅशलेस मोहिमेंतर्गत सोलापूर विभागातील 10 रेल्वे स्थानकांवर मोबाईल ऍपद्वारे तिकीट खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मसह सुपरफास्ट रेल्वेच्या तिकिटाचीही खरेदी या ऍपद्वारे करणे शक्‍य आहे.

सोलापूर - कॅशलेस मोहिमेंतर्गत सोलापूर विभागातील 10 रेल्वे स्थानकांवर मोबाईल ऍपद्वारे तिकीट खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मसह सुपरफास्ट रेल्वेच्या तिकिटाचीही खरेदी या ऍपद्वारे करणे शक्‍य आहे.

सोलापूरसह गुलबर्गा, दौंड, साईनगर, लातूर, पंढरपूर, कुर्डुवाडी, वाडी, अक्कलकोट रोड, गाणगापूर रोड या स्थानकांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ऍपद्वारे प्लॅटफॉर्म तिकीट, द्वितीय श्रेणीचे सर्वसाधारण आणि मेल व एक्‍स्प्रेस गाड्यांचे रेल्वे तिकीट खरेदी करणे शक्‍य होणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना भारतीय रेल्वे सर्वसाधारण तिकिटाचा ऍप (UTS App-indian Railway Unreserved Ticketing) लॉग इन करावा लागेल. या ऍपचा वापर केल्यावर तिकीट कन्फरमेशन मेसेजवर तीन अंकी कोड येईल. त्यानंतर या 10 रेल्वे स्थानकांवर सुविधा करण्यात आलेल्या एटीव्हीएम मशिनवर मोबाईल तिकीट ऑप्शनचे बटन दाबल्यावर तीन अंकी कोड दाबल्यावर प्रवाशांना तिकीट मिळेल. या व्यतिरिक्त स्मार्ट कार्डनी ऑटोमॅटिक तिकीट वेडिंग मशिनद्वारे तिकीट काढल्यास पाच टक्के सवलत मिळणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Mobile app for railway tickets