मोबाईल टॉवर बनताहेत पक्षांसाठी मृत्युचे जाळे

bird
bird

सोलापूर - विजापूर रस्त्यावरील पत्रकार भवन चौकातील मोबाईल टॉवरच्या बेसमेंटमध्ये तीस साळुंखी पक्षी मृतावस्थेमध्ये आढळून आले. पक्षीमित्र मुकुंद शेटे यांच्या तत्परतेने एका पक्षाचा जीव वाचविण्यात यश आले. 

टॉवरमध्ये पक्षी आडकल्याची माहिती पक्षीमित्र मुकुंद शेटे यांना कळली. वन्यजीव प्रेमी सदस्य शिवानंद आलूरे व प्रविण जेऊरे हेही तिथे पोचले. तांत्रिक अडचणीमुळे रात्री टॉवर उघडण्यात आले नाही. संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते टॉवर महापालिकेने सील केल्याचे समजले. पाठपुरावा केल्यानंतर टॉवर खोलण्यात यश आले. आतमध्ये एक जिवंत साळुंखी दिसली. तर तीस मृत साळुंख्या आढळुन आल्या. 

नव्या पद्धतीचे मोबाईल टॉवर वरुन खुले असतात, टॉवरच्या पाईपमध्ये पक्षी घरटी करण्यास आकर्षित होतात, घरटे बनविण्यासाठी गेलेल्या पक्षाला पुन्हा बाहेर पडता येत नसल्यामुळे अनेक पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. अन्न, पाण्याच्या अभावामुळे पक्ष्यांचा मृत्यू होतो. अशा टॉवरवर जाळे बसविण्यात यावेत यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. 
- मुकुंद शेटे, वन्यजीव प्रेमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com