मोहोळ: धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन 

mohol
mohol

मोहोळ (सोलापूर) - महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यात धनगर जात अस्तीत्वात असल्याची वारंवार चुकीची माहीती शासनाला पुरवून धनगर समाजाची घोर फसवणुक केल्या प्रकरणी सबंधितावर कारवाई व्हावी व धनगरांना त्वरीत अनुसुचीत जाती च्या आरक्षणाचा दाखला द्यावा. या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी तहसीलसमोर (आज) शनिवार रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. 

२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ४३०५८ व सोलापूर जिल्ह्यात १६५९ एवढी धनगढ जमात राहत असल्याची माहीती शासनाच्या रेकार्डला असुन, या संदर्भात जात पडताळणी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या संदर्भात माहीती घेतली असता एकही धनगढ अस्तीत्वात नाही. अशी माहिती देण्यात आली आहे. म्हणुन २०११ च्या जनगणनेमध्ये जे धनगढ दाखविले आहेत. त्यांच्या राहण्याचे दाखले, कुटुंबपत्रक, मिळावे अन्यथा या परिसरामध्ये धनगढ अस्तित्वात नसल्याचा दाखला मिळावा. या मागणीसाठी धनगर समाज बांधवानी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. यावेळी सर्वश्री पं.सं. सभापती समता गावडे, यशवंत नरुटे, रामचंद्र खांडेकर, नागनाथ भाऊ क्षिरसागर, कृष्णदेव वाघमोडे, संजय आण्णा क्षिरसागर, सुनील  पाटील, सज्जन पाटील, मालती टेळे, धनाजी गावडे, अशोक बरकडे, अनंता नागणकेरी, अतुल गावडे, सुशील क्षिरसागर, माणीक गावडे, गणेश गावडे, सागर लेंगरे, भिमराव जरग, राजाभाऊ सलगर, माणीक आवारे, दिनेश घागरे, फंटु गोपणे, दादा नरुटे, दिलीप टेकाळे, धनाजी पुजारी, बिरूदेव देवकते, सुनील शिंदे, धनाजी गावडे, सोमदेव गावडे, सिध्देश्वर आवारे, सागर लेंगरे, प्रशांत गाढवे, दाजी गाढवे, वसंत बरकडे, शहाजी कोळेकर, सत्यवान लेंगरे, निवृत्ती लेंगरे, संजय खरात, आदी  सह बहुसंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते. सुत्रसंचालन सुनील शिंदे यांनी केल .

धनगर समाजाच्या मागणीस वाढता पाठींबा 
धनगर समाजाच्या या आंदोलनास राष्ट्रवादीचे माजी आ. राजन पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपाध्यक्ष हेमंत गरड, शिवसेना तालुकाध्यक्ष काका देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश काळे, एम. आय. एम .चे बिलाल शेख, माजी सरपंच बिलालभाई शेख, दलित स्वंयसेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष मिलींद अष्टुळ, राज्य संघटक फकीरा जाधव, भारतीय दलित महासंघाचे संस्थापक संजीव खिलारे, भिम युवा प्रतिष्ठानचे संस्थापक  विनोद कांबळे, मनसेचे शाहुराजे देशमुख, भारतीय रिपब्लीक फ्रंटचे संस्थापक बंटी आवारे, रिपब्लीकन पार्टीचे हणमंत कसबे, आदीनी आंदोलनस्थळी उपस्थीत राहुन जाहीर पाठींबा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com