मोहोळ येथील शेतकऱ्यांचा जलसमाधी घेण्याचा इशारा

राजकुमार शहा 
गुरुवार, 24 मे 2018

सन 1995 मधे युती शासनाच्या काळात आष्टी उपसा सिंचन योजनेचा प्रारंभ झाला. मात्र निधी नसल्याने अनेक वर्षे हे काम रखडले. या कामाच्या काल त्यासाठी गेल्या अठरा वर्षापुर्वी जमिनी शासनाने संपादित केल्या आहेत.

मोहोळ - आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने संबंधित शेतकऱ्यांनी या योजनेच्या कालव्याला पाणी सुटल्यावर त्यात जलसमाधी घेण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे पाटबंधारे विभागाला दिला आहे. 

सन 1995 मधे युती शासनाच्या काळात आष्टी उपसा सिंचन योजनेचा प्रारंभ झाला. मात्र निधी नसल्याने अनेक वर्षे हे काम रखडले. या कामाच्या काल त्यासाठी गेल्या अठरा वर्षापुर्वी जमिनी शासनाने संपादित केल्या आहेत. कालवा पापरी येथील महादेव मंदिर परिसरातून जातो. वेळोवेळी अधिकाऱ्यांना भेटून लेखी निवेदने देऊन सर्व कागदपत्रकांची पुर्तता करूनही अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही. 

याच कामासासाठी अन्य शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या मात्र त्यांना मोबदला मिळाला व आम्हाला केवळ आश्वासने दिली. येत्या आठवड्यात मोबदला न मिळाल्यास कालव्याला पाणी सुटल्यावर त्यात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनावर माजी सैनिक चंद्रकांत लोंढे नागनाथ वाघमारे नागनाथ लोंढे विजय वाघमारे आदी सह अन्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आजपर्यंत निधी नव्हता. आता निधी उपलब्ध झाला आहे. येत्या आठवड्यात मोबदल्याची रक्कम देऊ.बी. व्ही. जीवने (सहाय्यक अभियंता पाटबंधारे विभाग)

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Mohol farmers warned for suicide