मोहोळ: पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत

राजकुमार शहा 
गुरुवार, 14 जून 2018

मोहोळ - मृग नक्षत्र निघुन आठवडयाचा कालावधी उलटला  अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र गेल्या आठवडया पासुन सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने बोर डाळींब केळी शेवगा या पिकांचे मोठ नुकसान झाले आहे. परिणामी या पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे. खरीपाची तयारी म्हणुन पंचायत समितीच्या कृषी विभागाने शासनाकडे विविध प्रकारच्या 590 क्वींटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी 232 क्वींटल बियाणे उपलब्ध झाले आहे. 

मोहोळ तालुका तसा रब्बीचा पण उजनी कालवा भिमा व सिना नद्या, आष्टी तलाव यामुळे मोठे क्षेत्र ओलीताखाली आले आहे. त्यामुळे खरीपाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. सध्या तालुक्यात बोर डाळींब शेवगा केळी या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. त्यांना चांगल्या प्रकारे  फुलधारणा झाली आहे. मात्र आठवड्या पासुन सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या पिकांचे फाटे हासडले की सर्व फुले गळुन जाऊ लागली आहेत. तर केळीची पाने फाटली  आहेत. त्यामुळे या पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.  

मृग नक्षत्राच्या पावसा अगोदर रोहिणी नक्षत्रात पडलेल्या पावसामुळे शेतकरी जमिनीची नांगरणी कुळवणी या मशागती करण्यात मग्न आहे. तर गेल्या आठवडया पासून पुन्हा ऊन वाढल्याने मशागत केली तर आहे ही ओल उडुन जाईल या भितीने सुरू असलेल्या मशागती थांबल्या आहेत. तालुक्यातील बैलांची संख्या कमी झाल्याने चालु हंगामात मशागती साठी लहान ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. 

खरीपाची तयारी म्हणुन कृषी विभागाने शासनाकडे सोयाबीन उडीद तुर मका सुर्यफुल या बियाणांची मागणी केली आहे. 

मागणी केलेले बियाणे पुढील प्रमाणे 
सोयाबीन - 50 क्वींटल 
उडीद - 60 
तुर- 40 
सूर्यफुल - 10
कांदा - 30
मका - 400

उपलब्ध बियाणे पुढील प्रमाणे
मका - 220
कांदा - 12

सध्या जोरदार वारे सुटले आहे पाऊस थांबला आहे कमी ओलीवर शेतकऱ्यांनी पेरणी करू नये पेरणी केलीच तर वाया जाण्याची भिती आहे.
उमेश काटे (तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती मोहोळ)
 
Web Title: Mohol: Farmers worried due to the delay in the rain