मोहोळमध्ये आगीत तीन दुकाने जळाली

मोहोळमध्ये आगीत तीन दुकाने जळाली

मोहोळ - शहरातील लोकनेते चौकात शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून भस्मसात झाली, तर अन्य दोन दुकानांचे किरकोळ नुकसान झाले. ही घटना बुधवारी (ता. 22) रात्री घडली.

येथील लोकनेते चौकातील पारसे फूट वेअर या चपलांच्या दुकानात काल रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. शेजारीच असलेली उत्कर्ष मोबाईल शॉपी, नागनाथ ड्रायक्‍लीनर्स, सवेरा किराणा आणि आणखी एका दुकानाचे या आगीत नुकसान झाले. लोकनेते शुगरच्या अग्निशमन पथकासह चिंचोली एमआयडीसी व लोकमंगलच्या अग्निशमन पथकांनी सुमारे दीड तासानंतर आग आटोक्‍यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com