मोहोळ तालुक्‍यात वीज पडून दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

मोहोळ - दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शुक्रवारी वीज अंगावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. योगेश सुनील भोसले (वय 20, रा. पापरी), पांडुरंग चांगदेव लबडे (वय 65, रा. हिवरे) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये सदाशिव श्रीरंग डिकरे, विष्णू नरहरी डिकरे, कविता जागनाथ डिकरे, लताबाई सिद्राम मते, मैनाबाई सदाशिव डिकरे (सर्व रा. हिवरे) यांचा समावेश आहे.
टॅग्स