आठ गावांत भरपूर डास

Mosquito
Mosquito

सांगली - जिल्ह्यात अमरापूर, भिलवडी, नांद्रे, जत, मणेराजुरी, येळावी, अंकलखोप, कसबे डिग्रज या आठ गावांत डासांची घनता जास्त आहे. मेमध्ये कवठेपिरान, मालेवाडी येथे डेंगीचा उद्रेक झाला. बेवनूर, पलूस, शिराळा, उटगी, कवठेपिरान येथे चिकुनगुण्याचा उद्रेक झाला, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून महिना हिवताप जनजागरण मोहीम म्हणून साजरा केला जात आहे. 

श्री. राऊत म्हणाले,‘‘हिवताप, डेंग्यू, चिकुनगुण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करताना हिवतापाचे रुग्ण अत्यल्प आढळत आहेत. ग्रामीण व शहरी भागात डेंगी व चिकुनगुण्याचे रुग्ण मिळतात. हिवताप थंडी वाजून येणारा ताप प्लासमोडीयम या परोपजीवी जंतूमुळे होतो. त्यांचा प्रसार ॲनाफिलिस डासांमार्फत होतो. घर, परिसरात डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावीत. कायम डास उत्पन्न होणाऱ्या ठिकाणी गप्पीमासे सोडावेत.’’

ते म्हणाले,‘‘रुग्णांनी ताप येताच रक्त तपासून घ्यावे. मोफत रक्तनमुना तपासणी उपलब्ध आहे. मानवनिर्मित डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करावीत. सायंकाळी दारे, खिडक्‍या बंद कराव्यात. डासप्रतिबंधक अगरबत्ती, मच्छरदानीचा वापर करावा. एडीस इजिप्टाय डासामुळे डेंगी व चिकुनगुण्या होतो. साचलेल्या पाण्यात त्यांची उत्पत्ती होते. आठवड्यात एक दिवस कोरडा पाळावा. टाक्‍यांत टेमीफॉस द्रावण टाकावे.’’

 डेंगी - मे अखेर २६ 
 चिकुनगुण्या - ६३ रुग्ण
 चिकुनगुण्या - मे अखेर ३७ रुग्‍ण  
 डासांची घनता जास्त - ८ गावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com