मुस्लिमांचे मागदर्शक महंमदगौस नदाफ यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

कोल्हापूर : येथील मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व तबलिक जमातीचे अमिर ए जमात महंमदगौस राजेखान नदाफ (वय 90) यांचे आज सायंकाळी निधन झाले. रात्री त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुस्लीम बोर्डिंगच्या पटांगणावर खास नमाज आयोजित करण्यात आली. त्यात पंधरा ते वीस हजारांवर मुस्लीम बांधव सहभागी झाले. रात्री अकरा वाजता बागल चौक दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी झाले. जिल्ह्याच्या विविध भागातून खास वाहनाने मुस्लीम बांधव कोल्हापुरात आले.

मुस्लीम समाजात महंमदगौस नदाफ यांच्या शब्दाला खूप मोठा मान होता. कोणताही धार्मिक, सामाजिक पेचप्रसंग निर्माण झाला की महंमदगौस नदाफ यांचा शब्द अंतिम मानून निर्णय घेतला जात होता. केवळ मुस्लीम समाज नव्हे तर अन्य धर्मातील ज्येष्ठांशीही त्यांचा सतत संवाद होता. प्रसिध्दीपासून पूर्णपणे लांब राहून त्यांचे कार्य चालू होते. गेले काही दिवस ते आजारी होते. सायंकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त जिल्ह्यात कळवण्यात आले. त्यामुळे खास वाहनाने मुस्लीम बांधव अंत्यविधीसाठी कोल्हापुरात आले.

पश्चिम महाराष्ट्र

शाखेत होती अठरा लाखाची रोकड; आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद श्रीगोंदे (जिल्हा नगर) : तालुक्यातील घोगरगाव येथील जिल्हा सहकारी...

04.51 PM

कोल्हापूर : शासनाकडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीचे भरण्यात येणाऱ्या आॅनलाईन, आॅफलाईन अर्ज नोंदींची माहिती...

04.48 PM

शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण : सौ.जाधव. मुरगूड (कोल्हापूर) : ज्ञानमंदिरात मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार...

04.39 PM