सर्वाधिक मतदार प्रभाग आठमध्ये

सर्वाधिक मतदार प्रभाग आठमध्ये

सोलापूर - महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय पूर्वप्राथमिक प्रारूप मतदारयादी तयार झाली असून, ती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग आठमध्ये सर्वाधिक ३३ हजार ५२६, तर सर्वांत कमी प्रभाग १२ मध्ये १७ हजार ०४७ मतदार आहेत. मतदारांची एकूण संख्या सहा लाख ४४ हजार ४५१ इतकी आहे. 

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जानेवारी २०१७ ही अर्हता दिनांक निश्‍चित करून मतदारयादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. या मतदार यादीसाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभानिहाय मतदारयाद्यांचा वापर करण्यात आला आहे. प्रारूप यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्यानंतर त्यास आयोगाची मंजुरी घेण्यात येतील. मंजुरी मिळाल्यावर ही यादी नागरिकांच्या माहितीसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. 

प्रभागनिहाय मतदारयाद्यांबाबत काही हरकती असल्यास त्या एकत्रित करून त्याची शहानिशा केली जाणार आहे. हरकतीमध्ये तथ्य आढळून आल्यास त्यानुसार बदल करण्यात येईल. ही यादी पूर्वप्राथमिक आहे. त्यामध्ये येत्या काही दिवसांत आणखीन बदल होण्याची शक्‍यता आहे. प्रभाग व कंसात मतदार, याप्रमाणे - प्रभाग क्रमांक ०१ (२५८६०), ०२ (२२३३१) ०३ (२७९१२), ०४ (२६७५५), ०५ (२०८९५), ०६ (२७६६५), ०७ (२६८८९), ०८ (३३५२६), ०९ (२७०००), १० (२३२८९), ११ (१७३१५), १२ (१७०४७), १३ (३०५४६), १४ (२७८१६), १५ (२९९४०), १६ (२४५७३), १७ (२८९७९), १८ (२५२५९), १९ (१९६७९), २० (१८२३८), २१ (२३४६०), २२ (२९८३५), २३ (२६२०५), २४ (२७५३७), २५ (१७४७४) व २६ (१८४२६). 

विधानसभानिहाय प्रारूप मतदार 
विधानसभा            पुरुष             स्त्री         तृतीयपंथी        एकूण

शहर उत्तर         १२४१७३       ११७७२६       १६       २४१९१५
शहर मध्य         १२९८२७       १२४३७८       ०४       २५४२०९
दक्षिण सोलापूर    ७८८३९          ६९४८६       ०२       १४८३२७
एकूण               ३३२८३९       ३११५९०       २२       ६४४४५१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com