सांगलीतील हरोली गावचे सरपंच, शिवसेना नेते पाटील यांची निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

कवठेमहांकाळ तालुक्‍यातील हरोली गावचे विद्यमान सरपंच, शिवसेनेचे नेते युवराज (अण्णा) पाटील यांची बुधवारी रात्री एकच्या दरम्यान निर्घृण हत्या करण्यात आली.

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्‍यातील हरोली गावचे विद्यमान सरपंच, शिवसेनेचे नेते युवराज (अण्णा) पाटील यांची बुधवारी रात्री एकच्या दरम्यान निर्घृण हत्या करण्यात आली.

पाटील हे देशिंग येथून हरोलीतील आपल्या घरी चारचाकी इनोव्हा गाडीतून जात होते. दरम्यान वस्तीवरील घरासमोर गाडी लावून ते निघाले असताना अंधारात पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्‍यात व मानेवर वार केल्याने ते जागीच ठार झाले. शिवसेनेचे कवठेमहांकाळ तालुका प्रमुख दिनकर तात्या पाटील यांचे ते बंधू होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.