मुस्लिम आरक्षणाचा लढा राहणार कायम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

सोलापूर - मुस्लिम आरक्षणासाठी नांदेड, औरंगाबाद, नागपूर अशा अनेक ठिकाणी आंदोलने होऊनही मुख्यमंत्र्यांना काही अर्थबोध होत नाही. रोजगार, शिक्षणामध्ये प्रगती करण्यासाठी मुस्लिमांना आरक्षणाची नितांत गरज आहे. मात्र, "एमआयएम'कडून मुस्लिम आरक्षणाचा लढा कायम चालू राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले. 

सोलापूर महापालिका निवडणुकीतील एमआयएम उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार ओवेसी यांची आज सभा झाली. ओवेसी म्हणाले, ""आरक्षण हा मुस्लिमांचा मूलभूत हक्‍क असून, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले तर तो स्पर्धेत टिकणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा लढा कायम चालू राहणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना दलितांचे कवच असलेला ऍट्रॉसिटी कायदा काढण्याची भाषा करीत आहेत. ऍट्रॉसिटी कायदा कायम राहिला पाहिजे, उलट हा कायदा आणखी मजबूत केला पाहिजे.'' 

""हजार-पाचशेच्या नोटा बंद करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचे उच्चाटन करण्याची भाषा केली होती. मात्र, या नोटाबंदी निर्णयाने दहशतवाद कमी झाला नसून उलट वाढला आहे. पाकिस्तानातून 2015मध्ये भारतात 32 दहशतवादी घुसले होते, आता तीच संख्या 232 वर गेली आहे. नोटाबंदीमुळे अनेकांचे हाल झाले असून, हातावर पोट असलेल्या गोरगरिबांचे विवाह, इतर कार्यक्रम लांबणीवर पडले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाने सर्वांना कठीण समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यात मे, जूननंतर तर खूप वाढ होणार आहे,'' असेही ओवेसी म्हणाले. 

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर : मेढा-सातारा-तुळजापूर बसचे आता रोज नविन किस्से समोर येउ लागलेत. 19 जूनला हेडलाइट बंद पडल्याने या मार्गावरील बसने...

10.27 AM

काशीळ - येथील डॉ. सिकंदर आदम शेख आणि शाहूपुरी (सातारा) येथील डॉ. अशोक गुंडू पाटील हे दोघे पुन्हा एकदा गर्भलिंग निदान...

03.48 AM

मिरज - मिरज-सांगली रस्त्याच्या सहा पदरीकरणात बळी पडलेल्या काही वटवृक्षांना नवजीवन देण्याची धडपड वृक्षप्रेमींनी सुरू ठेवली...

03.21 AM