महिलाच चालवितात शोरूम

महिलाच चालवितात शोरूम

कोल्हापूर - ‘बांगड्या भरल्यास काय?’ असे एखाद्याला कुचेष्टेने बोलून त्याच्या कर्तृत्वावरच शंका घेतली जाते. पण बांगड्या भरलेल्या महिलांनीच कोल्हापुरात कर्तृत्वाचा डोंगर उभा करून हा वाक्‌प्रचार खोटा ठरवला आहे. केवळ पुरुषच हे काम करू शकतात, हे समजल्या जाणाऱ्या ऑटोमोबाईल क्षेत्रात वॉचमन पासून मेकॅनिकपर्यंत व सेल्सपासून मॅनेजमेंटपर्यंत महिलाच या शोरूममध्ये कार्यरत आहेत.

ऑटोमोबाईल क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे. या क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या मुलींना संधी मिळावी, या उद्देशाने मुकेश भंडारी यांनी ‘माय होंडा ड्रिम्स’च्या माध्यमातून महिलांनी चालवलेल्या शोरूमची निर्मिती केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. सुरुवातीला काही मुलींना टेक्‍निकल कामाचे प्रशिक्षण द्यायला सुरू केले. त्यांनी केलेले हे काम पाहून मुलीही हे काम करू शकतात, असे जाणवले. अशा प्रकारच्या शोरूमची ‘होंडा’ कंपनीला कल्पना देण्यात आली. होंडा कंपनीनेही याबाबत मान्यता दिली.  

यामधील ऑईल बदली करणे, फिल्टर, क्‍लच, लाईटस्‌, बल्ब चेक करणे, स्पेअर पार्ट बदलणे अशी सर्व कामे महिला करतात. सिक्‍युरिटी, रिसेप्शनिस्ट, स्टोअर मॅनेजर, स्टोअर किपर, ॲडव्हायझर, सुपरवायझर, सेल्स मॅनेजर, मेकॅनिक, कस्टमर रिलेशन ऑफिसर, मॅनेजर या सर्व पदांवर महिला कार्यरत आहेत. एकूण १८ महिलांचा यामध्ये समावेश आहे. यानिमित्ताने करवीर नगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. 

महिलांनी महिलांसाठी चालवलेले शोरूम व वर्कशॉप हा भारतातील पहिलाच उपक्रम आहे. या माध्यमातून महिलांना सुरक्षित वाटावे, त्यांच्या स्वतःच्या गाडीची कामे त्यांनी येथे येऊन करवून घ्यावीत. तसेच मुलींनाही या क्षेत्रातील संधी मिळावी, या उद्देशाने या शोरूम व वर्कशॉपची उभारणी करत आहोत. 
- मुकेश भंडारी,
मालक 

दोन वर्षापूर्वी ऑटोमोबाईलमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर येथे टेक्‍निशियनचे काम करण्यास सुरुवात केली. येथे त्याचे प्रशिक्षणही घेतले. आता सर्व दुरुस्तीचे काम स्वतःच करते. 
- स्नेहल कदम,
टेक्‍निशियन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com