रस्त्यावरील लढाई राज्यकर्त्यांच्या खुर्च्या हलवेल - एन. डी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ "मॉर्निंग वॉक'
कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे.. अमर रहे..., "लाल सलाम, लाल सलाम..' अशा घोषणा देत ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकाळी मॉर्निंग वॉक निघाले. रस्त्यावरील लढाईत राज्यकर्त्यांची खुर्ची हलविण्याची ताकद निर्माण होत आहे, असे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज दोन वर्षे पूर्ण झाली. हत्येनंतर पानसरे कुटुंबीय आणि त्यांचे कार्यकर्ते दोन वर्षे प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेस मॉर्निंग वॉकने सरकारचा निषेध करीत आहेत. आज सकाळी आठ वाजता मॉर्निंग वॉकला सुरवात झाली.

कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे.. अमर रहे..., "लाल सलाम, लाल सलाम..', "अमर रहे अमर रहे कलबुर्गी, पानसरे, दाभोलकर अमर रहे' अशा घोषणा दिल्या. दोन वर्षांनंतरही तपास अपूर्णच आहे, मारेकरी मोकाट आहेत. पोलिस, सरकार यांना मारेकरी सापडत नाहीत, तरीही रस्त्यावरील लढाई सुरूच राहणार आहे. या लढाईला प्रतिसाद वाढत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. मेघा पानसरे यांनी तपास सुरू आहे, पण प्रगती नाही, यातून सरकारचा नाकर्तेपणा दिसून येतो. सरकार हे अपयश झाकून ठेवू शकत नाही. मारेकऱ्यांपर्यंत जोपर्यंत पोलिस पोचत नाहीत, तोपर्यंत लढाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

यानंतर घोषणा देत मॉर्निंग वॉक बिंदू चौकात दाखल झाले. महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थी, मध्य प्रदेशमधील प्रोग्रेसिव्ह राइटर असोसिएशन (भोपाळ)चे लेखक विनीत तिवारी यांनीही मनोगत व्यक्त केले.

महाराष्ट्रातील वैचारिक जनजागृती देशाला दिशा देणारी आहे. आम्हा विचारवंतांचा आवाज दाबला, तोंड बांधले तरीही गुंगे होऊन आमची लढाई सुरूच राहील, असे त्यांनी जाहीर केले. उदय नारकर यांनीही हत्या करून विचार मरत नाहीत. म्हणून आमची विचारांची लढाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

बिंदू चौकात सर्वांनी "लोकशाही'चा सन्मान राखण्याची प्रतिज्ञा केली.