राळेगणसिद्धी येथे 60 हजारावर रुग्णांची तपासणी

राळेगणसिद्धी येथे आयोजित महाआरोग्य शिबीरात नामवंत डॉक्टरांकडून सुमारे 60 हजारावर रूग्णांची तपासणी करण्यात आली.
राळेगणसिद्धी येथे आयोजित महाआरोग्य शिबीरात नामवंत डॉक्टरांकडून सुमारे 60 हजारावर रूग्णांची तपासणी करण्यात आली.

राळेगणसिद्धी (नगर): येथे आयोजित महाआरोग्य शिबीरात नामवंत डॉक्टरांकडून सुमारे 60 हजारावर रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील काही रूग्णांच्यावर मोफत औषोधोपचार करण्यात आले. ज्या रुग्णांना शस्त्रक्रीयेची गरज आहे, त्यांच्यावर लवकरच पुढील काही दिवसात विविध नामवंत डॉक्टरांकडून पुन्हा तपासण्या करूण योग्य त्या शस्त्रक्रीया मोफत करण्यात येणार आहेत.

राळेगणसिद्धी गावास रविवारी (ता. 19) यात्रेचे स्वरूप आले होते. सुमारे 60 हजारावर रूग्ण त्यांच्या बरोबर एक साथीदार, तसेच सुमारे चार हजारावर स्वंयसेवक दीड हजार डॉक्टर तसेच अनेक कार्यकर्ते नेते मंडळींनी गाव फुलून गेले होते. राळेगणसिद्धी छोटे खेडे अवघ्या आडीच हजार लोकवस्तीचे गाव मात्र गजबजून गेले होते. अनेक रूग्ण एकमेकांना मदत करताना दिसत होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच रुग्णांची नांव नोंदणी व तपासणी सुरू झाली होती. लगेचच त्यांना मोफत औषधे दिली जात होती. अनेकांनी तपासण्या झाल्यानंतर गर्दीतून घरी जाणे पसंत केले. दिवसभर महा आरोग्य शिबीराच्या निमित्ताने सुमारे 20 एकर क्षेत्रावर टाकलेले मंडप गच्च गर्दीने फुलून गेला होता. कोणताही गोंधळ न होता तपसणी पार पडत होती. मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी व सुमारे एक लाख लोकांना जेवणाची स्वतंत्र मंडपात सोय केली होती.

मोफत औषधे देण्यासाठी सुमार पाच ट्रक औषधांचा साठा करूण ठेवा होता. शिबीर अतीशय चांगल्या वातावरणा पार पडले. अनेक रुग्णांनी तपासणी झाल्या नंतर शिबीरातील तपासणी व औषोधोपचारा बाबत समाधान व्यक्त केले. नेत्र तपासणी, कान, नाक व घसा, श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक तर त्यानंतर स्त्री रोग तसेच हडांचे रूग्ण यांची संख्या अधिक होती. त्या मानाने इतर रुग्णांची संख्या कमी होती. या शिबीराचा अनेक गरजू व गोरगरीबांना लाभ झाल्याने अशी शिबीरे तालुक्यातील इतर गावातही घ्यावीत अशी अपेक्षा अनेकानी या वेळी व्यक्त केल्या. शिबीरात वृद्धांची संख्या लक्षणिय होती. वृद्धांकडे प्रामुख्याने कुटुंबातील तरूणांचे दुर्लक्ष होते, त्यामुळे त्यांना या शिबीराचा लाभ झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

ग्रामिण भागातील पहिलेच असे शिबीर होत आहे. याची राज्यभरात गरज आहे. काही सामान्य रुग्णांना जन्मापासून काही आजर होते. मात्र, ते त्यांना माहीत नव्हते किंवा त्यांनी डॉक्टरांना दाखविलेच नाही. अता निदान झाले आहे. त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रीया व उपचारही होणार आहेत, असे शिबीर राज्यात कोठेच झाले नव्हते असे डॉ. तात्याराव लहाणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com