घरगुती वादातून पत्नीवर ऍसिड हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

नगर - घरगुती वादातून भिंगारमध्ये एकाने काल (ता.3) सायंकाळी पत्नीवर ऍसिड फेकले. याबाबत भिंगार कॅम्प पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी पतीस पकडले असून, जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलमगीर (भिंगार) येथील एका जोडप्यात कौटुंबिक वाद होता. पत्नी काल सायंकाळी एका ओळखीच्या शिक्षकासोबत मुलाला शाळेतून घेऊन जात असताना पतीने त्यांना अडविले. घरगुती वादातून त्याने पत्नीच्या अंगावर ऍसिड फेकले. त्यात ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर आरोपी पळून गेला. तो सैनिकनगर भागात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले.

Web Title: nagar news acid attack on wife